आरोग्य व शिक्षण

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा शिक्षकांन कडून कुपोषित बालकांना दिला सकस आहार

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा शिक्षकांन कडून कुपोषित बालकांना दिला सकस आहार

. श्रीरामपूर तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या मदतीतुन अंगणवाडीतील कुपोषित 190 बालकांना सकस पुरक आहाराच 190 किट नुकतेच पंचायत समितीच्या सभागृहात कुपोषित बालकांना वाटप केले गेले. पंचायत समितीचे गट विकास आधिकारी श्री. मच्छिंद धस यांनी शिक्षक संघटनेशी चर्चा करून मदतीचे आव्हान केले होते. त्यांच्या आव्हाना ला सकारात्मक प्रतिसाद देत सामाजिक बाधिलकी जपत तालुक्यातील सर्वच प्राथमिक शिक्षकांनी मदत केली व एक लाख दोनहजार रुपये जमा करून कुपोषित बालकांना प्रोटीन डबा बदाम काजू शेंगदाणा चिक्की राजगीरा लाडू काळी खजुर इ. सकस पदार्थांचे किट कुपोषित विद्यार्थ्यांना वाटप केले. पंचायत समिती मध्ये प्रातिनिधीक स्वरूपात वाटप करून उर्वरित बालकांना त्यांच्या गावच्या प्राथमिक शाळेत शिक्षकांच्याहस्ते वाट प करावे असे ठरले त्या निर्णयानुसार काल वांगी बु जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत अंगणवाडीतील दोन कुपोषित बालकांना पोषक आहाराच्या किटचे वाटप करण्यात आले. शाळेचे मुख्या ध्यापक श्री बाळासाहेब पोळ सर यांच्या हस्ते कु. वेदा धनंजय माने या बालिकेला तर श्री.प्रमोद सोनकांबळे सर यांच्या हस्ते कु. . सपना सिताराम बर्डे या बालिकेला पोषण आहाराचे किट वाटप करण्यात आले . या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते श्री. धनंजय माने , श्री. बाळासाहेब पोळ सर श्री बाबासाहेब मते सर श्री बाबाजी डुकरे सर श्री सुनिल बागुल सर श्री प्रमोद सोनकांबळे सर अंगणवाडी सेविका श्रीमती मंदाबाई पवार मदतनीस सी आसराबाई बिडगर सर्व पालक ग्रामस्थ उपस्थित होते. सुत्रसंचलन श्री बागुल सर यांनी केले तर आभार श्री सोमकांबळे सर यांनी मानले .

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे