वांगी बुद्रुक मध्ये या वन्य प्राण्याने घातला धुमाकूळ

श्रीरामपूर तालुक्यातील वांगी बुद्रुक मधील गणेश मच्छिंद्र बर्डे यांचे पहाटे पाच वाजेच्या दरम्यान शेळी केली फस्त.
वन अधिकारी पवार यांनी घटनेच्या ठिकाणी येऊन खलेल्या शेळीचा तसा पंचनामा केला आहे. वांगी बुद्रुक व परिसरामध्ये बिबट्यांचे वास्तव्य असल्याचे आढळून आले परिसरात पिंजरा लावण्याची मागणी जोर धरला आहे याची दखल वन विभागाने तात्काळ घेण्याची गरज आहे सध्या ऊस तोड चालू असल्याने उसाचे क्षेत्र कमी होत असल्याने वन्य प्राण्यांनी नागरिकांना त्रस्त केले आहे त्यातच बिबट्या सारख्या प्राण्यांची दहशत असल्याने सध्याला गहू हरभरा कांदे पिकांच्या लागवडी जास्त प्रमाणात असल्याने शेतकऱ्यांच्या मुळावर असलेल्या एमएससिबी ची रात्र लाईट असल्यामुळे त्यात थंडी व शेतकऱ्यांना रात्री पाणी भरावे लागते शेतकरी रात्र रात्र जागत आहे त्यातच अशा काही पाळीव जनावरे शिकार झाल्यानंतर स्थानिक वनाधिकारी नागरिकांचे फोन उचलत नसल्याच्या ग्रामस्थांमध्ये चर्चा चालू आहे वन विभागाने याची दखल घेण्यात यावी अशी ग्रामस्थांची मागणी होत आहे तसेच या परिसरामध्ये तात्काळ पिंजरा बसविण्याची देखील मागणी होत आहे