टाकळीभान येथे “भाजपा स्थापनादिन” साजरा.
टाकळीभान येथे “भाजपा स्थापनादिन” साजरा.
श्रीरामपूर तालूक्यातील टाकळीभान येथे भाजपा शाखा टाकळीभान यांचे वतीने “भाजपा स्थापनादिन” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी ९ वाजता मोटार सायकलला भाजपा ध्वज लावून गावातून मोटार सायकल रॅली काढण्यात आली होती. या रॅलित मोठ्या प्रमाणात भाजपा कार्यकर्ते,पदाधिकारी सहभागी झाले होते.
सकाळी १० वाजता येथील बसस्थानका समोरील कमाणीमध्ये भाजपाचे ध्वजारोहण करून भारत मातेच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. तसेच यावेळी राष्ट्रगीत व वंदेमातरम गीत म्हणण्यात आले.
यावळी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचा लाइव्ह जनसंवाद लाऊड स्पिकरच्या माध्यमातून ऐकविण्यात आला. भाजपा स्थापनादिना निमित्त सर्व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घरावर भाजपाचे ध्वज लावले होते तसेच घरासमोर सडा टाकून कमळ फुलाची रांगोळी काढण्यात आली होती.
भारत मातेच्या पूजना नंतर आजी,माजी सैनिक, ज्येष्ठ कार्यकर्ते, नागरिक, प्रबुद्ध नागरिक यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी भारत माता की जय,भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या.
यावेळी माजी सभापती नानासाहेब पवार, मुकुंद हापसे, नारायण काळे, श्रीकृष्ण वेताळ, भाऊसाहेब पवार, अनिल दाभाडे, भगवान पाडांगळे, संजय पवार, विलास पटारे, पप्पू रणनवरे,
बंटी मगर, ृऋषिराज हापसे, महेश बोडखे, श्रीराम जोशी, सुभाष कांगुणे, किशोर हुळहुळे, राजेंद्र रणनवरे आदी उपस्थित होते.
टाकळीभान— येथील भाजपाच्या वतीने भाजपा स्थापनादिन साजरा करण्यात आला. यावेळी भारत मातेचे पूजन करण्यात आले. यावेळी नानासाहेब पवार, मुकुंद हापसे, नारायण काळे, श्रीकृष्ण वेताळ,भाऊसाहेब पवार, आदी कार्यकर्ते.