महाराष्ट्र

कृषि विज्ञान केंद्र, दहीगाव येथे उद्योजकता विकास विषयावर प्रशिक्षण वर्ग संपन्न

*कृषि विज्ञान केंद्र, दहीगाव येथे उद्योजकता विकास विषयावर प्रशिक्षण वर्ग संपन्न*

 

श्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे कृषि विज्ञान केंद्र दहिगाव-ने व आत्मा अहमदनगर (ता. नेवासा) यांच्या संयुक्त विद्यमाने शेती पूरक उद्योग व उद्योजकता विकास या विषयावर दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला. यात नेवासा तालुक्यातील ५५ शेतकऱ्यांनी उस्फुर्तपणे भाग घेतला. दोन दिवसीय प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन केव्हीके दहीगाव-ने प्रमुख आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. श्यामसुंदर कौशिक यांनी केले. यावेळी त्यांनी शेती पूरक उद्योगातील विविध संधी शोधून शेतकऱ्यांनी विशेषतः युवा शेतकऱ्यांनी उद्योजक होण्यासाठी प्रयत्नशील रहावे तसेच उद्योजक कसा असावा याबद्दल मार्गदर्शन केले. तर समारोपावेळी श्री. विलास नलगे, उपविभागीय कृषि अधिकारी, श्रीरामपूर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्राचे वाटप केले व प्राप्त केलेल्या प्रशिक्षण व कौशल्याचा वापर प्रत्यक्ष कृतीत उतरावा असे नमूद केले. या प्रशिक्षण वर्गात ऊस रोपवाटिका उभारणी, जिरेनियम लागवड व प्रक्रिया, उद्योजकता व शेतकरी उत्पादक कंपनीची उभारणी, भाजीपाला व फळरोपवाटिका उभारणी, गांडूळ खत निर्मिती, रेशीम उद्योग व मधुमक्षिका पालन आणि स्मार्ट व पीएमएफएमई या उद्योजकता संबंधी योजनांबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. कृषि विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ सर्व श्री माणिक लाखे, सचिन बडधे, नंदकिशोर दहातोंडे, नारायण निबे, इंजी. राहुल पाटील, प्रकाश हिंगे, प्रकाश बहिरट तर आत्मा नगर चे केदार फुलसुंदर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी समन्वयक म्हणून केव्हीके चे सचिन बडधे व आत्मा नेवासा येथील संजय जाधव व प्रविण देशमुख, संजय थोटे व दत्तात्रय वंजारी तसेच केव्हीके दहीगाव सर्वच अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे