आरोग्य व शिक्षण
अनोख्या पद्धतीने कर्तुत्ववान महिलांचा सन्मान’

कर्तुत्ववान महिलांचा सन्मान’
टाकळीभान येथे न्यू इंग्लिश स्कूल न आण्णासाहेब पटारे पा. कनिष्ठ महाविद्यालयामध्ये ‘जिजाऊ ते सावित्री’ या शासन उपक्रमांतर्गत कर्तृत्ववान महिलांचा सन्मान’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रम प्रसंगी गावच्या प्रथम नागरिक सरपंच मा. सौ. अर्चनाताई रणनवरे, उद्योजिका मा. सौ. रूपालीताई पटारे, ग्रामपंचायत सदस्या मा. सौ. अर्चनाताई पवार, पत्रकार मा. श्रीमती अनिताताई तडके या उपस्थित होत्या. याप्रसंगी उपस्थित कर्तुत्वान महिलांचा विद्यालयातर्फे स्नेहवस्त्र व गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य
बापूसाहेब पटारे, विद्यालयाच्या स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य श्री. राहुलभाऊ पटारे, विद्यालयाचे प्राचार्य मरभळ साहेब तसेच चाबुकस्वार मॅडम , श्रीमती नाटके मॅडम, अहिरे मॅडम, सोनवणे मॅडम, पांढरे मॅडम, गेडाम मॅडम, पायपिंड, सोनुने, कोकाटे मॅडम. ज्योती थोरात मॅडम उपस्थित होते.