संजय वैरागर राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

संजय वैरागर राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित
. स्व.र्पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था निमगाव वाघा तालुका जिल्हा अहमदनगर यांच्या वतीने नुकतेच राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा आणि राज्यस्तरीय काव्य संमेलन 2023 या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
या कार्यक्रमात संजय वैरागर यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट निवेदक पुरस्कार 2023 या पुरस्काराने आमदार निलेश जी लंके साहेब यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले, या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून नगर पारनेर मतदार संघाचे लोकप्रिय आमदार निलेश जी लंके साहेब उपस्थित होते तसेच प्रा. डॉ. शंकर चव्हाण ज्येष्ठ साहित्यिक शेवगाव माधवराव लामखेडे जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र उदागे अध्यक्ष शब्द गंध साहित्यिक परिषद अहमदनगर डॉ वाल्मीक अहिरे ज्येष्ठ साहित्यिक जळगाव रज्जाक शेख शर्मिला गोसावी साहित्यिक कवी सिताराम नरके सुभाष सोनवणे लताबाई फलके अतुल फलके भाऊसाहेब ठाणगे आदी मान्यवर उपस्थित होते संस्थेचे अध्यक्ष नाना डोंगरे यांनी मान्यवरांचे स्वागत केले या कार्यक्रमात राज्यामधून अनेक कवींनी सहभाग घेतला नाना डोंगरे मंदा डोंगरी यांनी उपस्थित राहिलेल्या मान्यवरांचे स्वागत केले असून सोनईतील अंबादास राऊत, रवींद्र चव्हाण, उदय करडक, विकास चव्हाण, अरुण वैरागर, सदाशिव चव्हाण, लखन वैराळ, सलीम शेख, अनिल निमसे, यशवंत भोगी, यांनी अभिनंदन केले