राजकिय

तालुका पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी गटनिहाय आरक्षण  जाहीर

तालुका पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी गटनिहाय आरक्षण  जाहीर

 

श्रीगोंदा तालुका पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी गटनिहाय आरक्षण आज जाहीर झाले . त्यात कोळगाव पंचायत समिती गणात नागरिकांचा मागास प्रवर्ग तर घारगाव पंचायत समिती गणात सर्वसाधारण महिला यांना संधी मिळणार आहे. कोळगाव जिल्हा परिषद गट अनुसूचित जाती (महिला)साठी राखीव झाला आहे. त्यामुळे ज्यांनी गण व गटात निवडणूक लढविण्याची तयारी केली होती त्यांची या आरक्षणामुळे निराशा झाली. तर काहींना नव्याने संधी प्राप्त झाली आहे.

कोळगाव पंचायत समिती गणात इच्छुकांची मांदियाळी मोठ्या प्रमाणात असून त्यामध्ये पंचायत समितीचे माजी सभापती पुरुषोत्तम लगड, श्रीगोंदा कारखान्याचे माजी संचालक हेमंत नलगे, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस संतोष लगड, माजी उपसरपंच अमित लगड, नितीन नलगे, मधुकर लगड ,सध्याचे विद्यमान सदस्य विजय नलगे, संतोष मेहत्रे, दामूकाका साके, विश्वास थोरात, चिखलीचे रामदास झेंडे, सुरेगावचे अंकुश रोडे, घुटेवाडी चे संभाजी घुटे, उक्कलगाव चे डॉक्टर वाळके, मुंगसगावचे सुजित इथापे, कोरेगावचे ज्ञानेश्वर कवडे, बाळासाहेब मोहारे यांचा इच्छुकांमध्ये समावेश आहे.

परंतु मूळचे ओबीसी समाजातील इच्छुक उमेदवारांची संख्या कमी असून ओबीसी प्रमाणपत्र काढलेल्यांची संख्या यामध्ये जास्त आहे ही बाब उल्लेखनीय आहे.

 

घारगाव पंचायत समिती गणात जिल्हा बँकेचे माजी संचालक दत्तात्रय पानसरे, लालासाहेब पानसरे ,राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार यांचे पुत्र प्रवीण शेलार, शहाजी हिरवे, ऍडव्होकेट निलेश शेलार, कुकडीचे संचालक जालिंदर निंभोरे, एकनाथ बारगुजे, बाबासाहेब बारगुजे,रमेश खोमणे, यांच्या पत्नींना व मनीषा कोठारे यांना संधी मिळू शकते.

 

  अनेक वर्षाच्या कालखंडानंतर कोळगाव जिल्हा परिषद गटात अनुसूचित जाती महिला आरक्षण मिळाले आहे त्यामुळे पहिल्यांदाच या गटात नवीन चेहऱ्यास संधी मिळणार आहे. त्यामध्ये कर्मवीर अकॅडमीच्या संचालिका पल्लवी महेशकुमार शिंदे, कोळगावच्या विद्यमान सरपंच वर्षा काळे, प्रतिभा धस, सोनाली गाडेकर, जयश्री काळे, पारगावचे ग्रामपंचायत सदस्य मंगेश घोडके यांच्या पत्नी, कोरेगावचे शिवाजी बुलाखे यांच्या पत्नी, हे आपले नशीब आजमावू शकतात.

 

 

कोळगाव जिल्हा परिषद गटात साधारणपणे 35000 मतदार असून कोळगाव गावात जवळजवळ दहा हजार मतदार आहेत. त्यामुळे कोळगावची भूमिका निर्णायक ठरू शकते.

 

 

सध्या तालुक्यात राष्ट्रवादीचे नेते राहुल जगताप, घन:श्याम शेलार, काँग्रेसचे राजेंद्र नागवडे, भाजपाचे आमदार बबनराव पाचपुते , शिवसेनेचे बाळासाहेब दुतारे हे गण व गटानुसार कोणती भूमिका घेतात यावर कार्यकर्त्यांचे भवितव्य अवलंबून असणार आहे. तसेच जगताप व नागवडे यांची सहमती एक्सप्रेस होती किंवा नाही हेही महत्त्वाचे आहे. दोघांनी आपले स्वतंत्र उमेदवार दिले तर कार्यकर्त्यांना संधी मिळेल, एकत्र लढले तर काहीशी नाराजी वाढेल. त्याचा फायदा आमदार पाचपुते यांना मिळू शकतो. त्यामुळे इच्छुकांची कितीही इच्छा असली तरी श्रेष्ठ काय भूमिका घेतात यावर बरेचसे चित्र अवलंबून असणार आहे.

 

गटनिहाय आरक्षणामुळे सध्या निवडणुकीचे पडघम वाजू लागल्याने जागोजागी चर्चा रंगू लागली आहे.कोणाला उमेदवारी मिळणार व कोणाचं नशीब उघडणार हे येणारा काळच ठरवेल.

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे