जि प . प्राथ.शाळा वांगी बु येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा

जि प . प्राथ.शाळा वांगी बु येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा
_ आज ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला पालकाचा महिला मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी शासकिय न्युट्रि टिव्ह स्लाइस ( बिस्किट ) विद्यार्थ्याना वाटप करण्याचे नियोजन करण्यात आलेहोते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपसरपंच सौ. गंगुबाई बाबासाहेब माने यांनी आपला बहुमोल वेळ दिला. यावेळी आरोग्य विभागाचे डॉ. सुनिल काकडे , श्रीम. सोनाली राऊत सिस्टर , डॉ . मृणाल , सौ . सुनिता उबाळे, सौ .मुक्ता आहेर, ( मदतनीस), सौ. अनिता आव्हाड, सौ. आसराबाई बिडगर, सौ. कांताबाई बिडगर, सौ . आशाबाई बिडगर, सौ. सत्यभामा मोरे , सौ. मनिषा कांबळे व महिला पालक उपस्थित होते. उपस्थित महिलांना शाळेतील मुलींनी श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत केले. उपस्थित महिलांच्या हस्ते मुलांना न्यु ट्रिटिव्ह स्लाइस (बिस्किट्स ) वाटप करण्यात आले. सौ . सोनाली राऊत मॅडम यांनी आरोग्य विषयक जाग्रती केली. कु प्राजक्ता तोरे व महेश बिडगर यांनी जागतिक महिला दिनाबददल माहिती सांगितली. यावेळी श्री . बाबासाहेब मते,श्री . बाबाजी डुकरे श्री . सुनिल बागुल श्री . प्रमोद सोनकांबळे सह सर्व जण उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय सूचना श्री . डुकरे सर यांनी मांडली. अनुमोदन श्री. बागुलसर यांनी दिले. कार्यकमाचे नियोजन श्री सोनकांबळे सरांनी केले. सुत्रसंचलन श्री . मतेसर यांनी केले व आभार मानले.