टाकळीभान टेलटँकच्या इनलेट रूंदीकरण व क्षमता वाढीबाबत जलसंपदा राज्यमंत्री ना. बच्चू कडू यांचे बरोबर चर्चा.

टाकळीभान टेलटँकच्या इनलेट रूंदीकरण व क्षमता वाढीबाबत जलसंपदा राज्यमंत्री ना. बच्चू कडू यांचे बरोबर चर्चा.
श्रीरामपूर तालूक्यातील टाकळीभानसह परिसरातील गावांना वरदान ठरलेल्या टाकळीभान टेलटँकच्या इनलेट रूंदीकरण व क्षमता वाढविण्याच्या संदर्भात जलसंपदा राज्यमंत्री ना. बच्चू कडू यांच्या बरोबर प्रहार जनशक्ती पक्षाचे नगर जिल्हा अध्यक्ष अभिजीत पोटे, जिल्हा कार्याध्यक्ष नवाज शेख, धरण ग्रस्त कृती समितीचे अध्यंक्ष कृष्णा सातपुते यांनी चर्चा केली.
राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मातोश्री स्व. इंदिराबाई कडू यांचे दुःखद निधन झाल्याने त्यांची बेल्लोरा, ता.चांदुर बाजार, जि.अमरावती येथे निवासस्थानी भेट घेवून त्यांचे सांत्वन केले. व यावेळी टेलटँक संदर्भात चर्चा करण्यात आली.
यावेळी टाकळीभान टेलटँकच्या इनलेट गेटच्या रुंदीकरण व क्षमता वाढीसंदर्भात बच्चू कडू यांनी तात्काळ कार्यकारी अभियंता श्री.नान्नोर यांना फोन करुन टाकळीभान टेलटँकची इनलेट रूंदीकरण व क्षमता वाढविणे कामी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. तसेच या कामासाठी भरीव निधी देणार असल्याचेही कडू यांनी यावेळी सांगितले.
यावेळी प्रहारचे जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे, जिल्हा कार्याध्यक्ष नवाज शेख, धरणग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष कृष्णा सातपुते, जिल्हा संघटक बाळासाहेब खर्जुले, ज्ञानेश्वर सांगळे, सोशल मिडीयाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघ, नेवासा तालुकाध्यक्ष जालिंदर लांडे, सुहास वखरे, संतोष रणनवरे, आप्पासाहेब बनकर उपस्थित होते.
टाकळीभान— येथील टेलटँकच्या इनलेट रूंदीकरण व क्षमता वाढविण्याच्या संदर्भात जलसंपदा राज्यमंत्री ना. बच्चू कडू यांचे निवास्थानी चर्चा करण्यात आली.
यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभिजीत पोटे, जिल्हा कार्याध्यक्ष नवाज शेख, सुहास वखरे, संतोष रणनवरे आदी.