उंबरे गाव एका वर्षात राज्य हादरून सोडणाऱ्या लागोपाठ तीन घटनांच्या दुष्कृत्यांनी महाराष्ट्राबरोबरच आता राज्याबाहेरही चर्चेत.गावातील किंवा जिल्ह्यातील मास्टर माईंड कोण?

उंबरे गाव एका वर्षात राज्य हादरून सोडणाऱ्या लागोपाठ तीन घटनांच्या दुष्कृत्यांनी महाराष्ट्राबरोबरच आता राज्याबाहेरही चर्चेत.गावातील किंवा जिल्ह्यातील मास्टर माईंड कोण?
राहुरी तालुक्यातील उंबरे गाव एका वर्षात राज्य हादरून सोडणाऱ्या लागोपाठ तीन घटनांच्या दुष्कृत्यांनी महाराष्ट्राबरोबरच आता राज्याबाहेरही चर्चेत आल्याने अशा घटनांमागील गावातील किंवा जिल्ह्यातील मास्टर माईंड कोण त्याचा तपास घ्यावा अशा मागणीने आता जिल्ह्यातून जोर धरला आहे.*
एक वर्षांपूर्वी कमलसिंग पास्टर बाहेरच्या जिल्ह्यातून येऊन उंबरे या छोटयाशा गावात शेकडो हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न करतो परंतु जागरूक नागरिकांमुळे व हिंदुत्ववादी धर्मरक्षकांमुळे कमलसिंगचा प्लॅन फसून त्याला त्या गुन्ह्यात तुरुंगात टाकण्यात आले. संपूर्ण जिल्ह्याबरोबरच राज्यालाही हादरून सोडणाऱ्या या घटनेचा आवाज विधानसभेतही गाजला.त्या भयानक घटनेची चर्चा संपत नाही तोच मुस्लिम शिक्षिकेने शिकवणीला येणाऱ्या हिंदू मुलींना मुस्लिम मुलांच्या जाळ्यात फसवण्यास मदत करत त्यांच्यावर अत्याचार करण्यासही मुस्लिम मुलांना मदत करणाऱ्या शिक्षेकेच्या नालायक प्रतापाचा भांडाफोड झाल्यावर पोलीस प्रशासनही आवाक झाले.या घटनेच्या चारच महिन्यांनी कालच्या बिहारच्या दलित हिंदू मुलीला जबरदस्तीने बिहारमधून पळवून आणून उंबरे गावातच तिच्यावर जबरदस्तीने अत्याचाराच्या घटनेने उंबरे गाव पुन्हा चर्चेत आले आहे.तीन महिन्यांपूर्वी बिहार येथून पळवून आणलेल्या अल्पवयीन दलित हिंदू मुलीला उंबरे गावातच आणण्यात आले.दहा दिवसांपासून होत असलेल्या अन्याय जबरदस्ती आत्ताचाराला वैतागून अल्पवयीन मुलीने गावकऱ्यांच्या मदतीने बिहारमधील आपल्या बहिणीला फोनद्वारे झालेला सर्व प्रकार सांगून उंबरे गावात बोलावले त्यानुसार त्या मुलीच्या पालकांनी बिहारमधून उंबरे गावात येऊन स्थानिक जागरूक ग्रामस्थांच्या मदतीने राहुरी पोलीस ठाण्यात एकोणीस वर्षीय आफताब व त्याच्या नातेवाईकांवर गुन्हा दाखल केला आहे.आफताब याच्याविरोधात पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्ह्याची नोंद झाली तर त्याच्या नातेवाईकांवर त्याला त्यकृत्यात मदत केली म्हणून गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
राहुरी तालुक्यातील उंबरे गावातच अशा घटना का घडत आहेत..?असा प्रश्न गावकऱ्यांबरोबर पोलीस प्रशासनालाही पडला आहे.असे दुष्कृत्य घडवण्यामागे गावातील कोणत्या मास्टर माईंडचा हात आहे त्याचा तपास लावून अशा अपप्रवृत्तीचा जोपर्यंत पोलीस बंदोबस्त करत नाहीत तोपर्यंत अशा हादरून सोडणाऱ्या दुर्दैवी घटना यापुढेही घडतच राहणार असल्याचे ग्रामस्थांचे मत असून असा मास्टर माईंड सापडल्यास त्याचा बंदोबस्त आमच्या स्टाईलने देऊ असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे .