महाराष्ट्र
माजी मंत्री महादेव जानकर यांनी केले जगताप कुटुंबीयांचे सांत्वन

माजी मंत्री महादेव जानकर यांनी केले जगताप कुटुंबीयांचे सांत्वन
राहुरी तालुक्यातील कोपरे येथील राष्ट्रीय समाज पक्षाचे सच्चे कार्यकर्ते कै. नानासाहेब जगताप यांचे काही दिवसापूर्वी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले एक सच्चा कार्यकर्ता हरपला म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी जगताप कुटुंबीयांची भेट घेऊन श्रद्धांजली अर्पण करून सांत्वन केले या परिवाराच्या सर्व दुःखात संकटामध्ये मी कायम आपल्या पाठीशी असणार असल्याचे मत जानकर यांनी व्यक्त केले.