अडबंगनाथांचे दर्शन घेऊन समाधान झाले खासदार डॉक्टर पद्मश्री विकास महात्मे साहेब नागपूर*

*अडबंगनाथांचे दर्शन घेऊन समाधान झाले खासदार डॉक्टर पद्मश्री विकास महात्मे साहेब नागपूर*
श्रीक्षेत्र अडबंगनाथ संस्थान भामानगर भामाठाण श्रीरामपूर,या संस्थांनला आज अचानक,खासदार पद्मश्री डॉक्टर विकास महात्मे साहेब यांनी भेट देऊन अडबंगनाथाचे दर्शन आशीर्वाद घेतले स्वामी अरुणनाथगिरी महाराजांचे आशीर्वाद घेऊन, संस्थांच्या कामासाठी निश्चित आम्ही प्रयत्न करू आणि काम मार्गी लावू असेही ते म्हणाले, अडबंगनाथाचा सुंदर परिसर रमणीय वातावरण स्वच्छता बघून खासदार साहेबांना अत्यंत आनंद झाला, अरुणनाथगिरी महाराज यांचे त्यांनी अत्यंत मोठे कौतुक केले, एवढ्या जंगलामध्ये अत्यंत खडतर परिस्थितीत आपण देवस्थान उभे केल्याबद्दल समाधान व्यक्त केले,आम्हीही या ठिकाणी आपल्याबरोबर आहोत आणि या ठिकाणी मदत करू या असेही ते म्हणाले, श्रीरामांच्या अश्रूंची विहीर बारव अडबंगनाथांच पवित्र क्षेत्र बघून आनंद वाटला, खासदार साहेबांच्या बरोबर नाशिक जिल्ह्याचे अध्यक्ष बापूसाहेब शिंदे साहेब, पत्रकार दत्ताभाऊ खेमनर, सागर भैय्या बेग, पत्रकार जालिंदर रोडे, नानाजी नाशिककर, आदी मान्यवर उपस्थित होते,स्वामी अरुणनाथगिरी महाराजांनी सर्वांचे आभार मानले, व नाथांचे वाग्मय त्यांना प्रसाद म्हणून दिले,