तिळापुर संगमेश्वर रस्त्याच्या कामात तात्काळ दुरुस्ती.

तिळापुर संगमेश्वर रस्त्याच्या कामात तात्काळ दुरुस्ती.
तिळापुर फाटा ते संगमेश्वर देवस्थान रस्ता दोन ते तीन टप्प्यात चालू असून तमनर घरचे पुढील काम अतिशय निकृष्ट पद्धतीने चालू होते हे गावातील नागरिकांनी पाहणी केल्यानंतर रुद्रां न्यूजचे संपादक नारायण चोरमले यांना याबाबत तंटामुक्ती अध्यक्ष अण्णासाहेब जाधव तसेच सात्विक दूध उद्योग समूहाचे चेअरमन विलास गीते यांनी माहिती दिल्यानंतर समक्ष पाहणी केली असता रोडचे काम कमकुवत होत असल्याने पंचायत समिती इंजिनिअर पाटील यांना याबाबत माहिती घेतली असता रोडचे इस्टिमेट वेगळे व काम वेगळ्या पद्धतीने चालू असल्याचे दिसून आल्यावर संबंधित ठेकेदाराला धारेवर धरण्यात आले व समक्ष काम चालू असलेल्या ठिकाणी येण्याची विनंती केली असता त्याने येण्यास टाळाटाळ केली. पंचायत समिती इंजिनियर पाटील यांनी सांगितले की पहिला खडीचा लेयर 6 इंची आहे परंतु संबंधित ठेकेदाराने सिंगल खडी पासून रोडचे काम पूर्ण तपासण्याचे घाई केल्याचे लक्षात आल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले लागलीच ठेकेदाराने सर्वांसमक्ष फोनवर माहिती देऊन काम चांगल्या पद्धतीने करून देतो व परत खडी टाकून देतो असे सांगितल्याने ठेकेदाराने कामांमध्ये लागलीच दुरुस्ती करून कामांमध्ये सुधारणा करण्याचे मान्य करून सुधारणा केली यावेळी ग्रामस्थांनी लक्ष दिल्याने काम चांगल्या पद्धतीने करता आले असून काम चालू आहे कामावरती ग्रामस्थांनी लक्ष देण्याचे आवाहन रुद्रा न्यूज चे संपादक नारायण चोरमले तंटामुक्ती अध्यक्ष अण्णासाहेब जाधव यांनी केले तसेच गावातील तसेच शासकीय कामांमध्ये कुठलेही अडचण असल्यास नागरिकांनी संपर्क साधण्याचे संपादक चोरमले यांनी आवाहन केले.