ब्रेकिंगमहाराष्ट्र

हिंदू जनजागृती समिती अहिल्यानगर यांच्या वतीने सोनई येथे प्रभू श्रीराम मंदिरात गुरू पौर्णिमे निमित्त कार्यक्रमाचे आयोजन

हिंदू जनजागृती समिती अहिल्यानगर यांच्या वतीने सोनई येथे प्रभू श्रीराम मंदिरात गुरू पौर्णिमे निमित्त कार्यक्रमाचे आयोजन

 

 

*सोनई(प्रतिनिधी):- देशहित,हिंदू धर्माच्या भल्यासाठी विचार असतील तिथं ते विचार “हराम” आणि देशविरोधी कारवाया व हिंदू धर्म भ्रष्ट करायचा असेल तिथं ते त्यांच्यासाठी “हलाल” असे थर्डक्लास विचार महजबी पुस्तकात घुसडवण्यात आलेत.हिजाबचा उल्लेख कुठेही नाही वाळवंटात उन्हापासून व रेतीपासून संरक्षण व्हावे म्हणून महिला आज जशा स्कॉर्प बांधतात तशा त्याकाळी तोंड झाकायच्या ती आज त्यांच्या धर्मातील प्रथा होऊन बसली असून हिजाबच्या आडूनच देशविरोधी कारवाया देशात वाढल्या आहेत.विधानसभा निवडणुकीत माझ्याच मतदारसंघात मी स्वतः एका हिजाबधारी महिलेने तीन वेळेस मतदान केल्याचा प्रकार उघड केला आहे.हिंदू मुली,महिलांना लवजिहाद सारख्या गलिच्छ प्रकारात अडकवून हिंदू मुलींना हिजाब घालून त्यांच्यावर अन्याय अत्याचार केला जातो. हिंदू जागृत झाल्यामुळे सध्या हे प्रकार कमी झाले असले तरी हिंदू महिला व मुलींनी आपल्या हिंदू धर्माचा आदर ठेवत स्वसंरक्षणार्थ असलेल्या प्रत्येक गोष्टी आत्मसात कराव्यात असे आवाहन राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर भैय्या बेग यांनी केले आहे.*

 

            हिंदू जनजागृती समिती अहिल्यानगर यांच्या वतीने सोनई येथील प्रभू श्रीराम मंदिरात गुरू पौर्णिमे निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून सागर भैय्या बेग हे बोलत होते.ते पुढे म्हणाले की,गेल्या सत्तर वर्षापासून हिंदू धर्म संपवण्याचे कटकारस्थान शांतपणे चालू आहे.हिंदू जनजागृती समितीच्या अविरत कार्यामुळे आज हिंदू जागा झाला आहे.शाळांमधून हिंदू धर्माचे शिक्षण मिळत नसल्याने विधर्मियांच्या शाळांमधून हिंदू धर्माविषयी चुकीची माहिती लहान मुलांना शिकवली जात आहे.हिंदुंच्या लहान मुलांना मशिदी विषयी माहिती शिकवली जाते मशिदीचा रंग कोणता त्यावरील अर्धा चांद बाबत माहिती हिंदू बालकांना शिकवण्यामागील कारण उघड करणे गरजेचे असून हिंदू पालकांनी अशा शाळांमध्ये जाऊन त्याबाबत जाब विचारला पाहिजे असे स्पष्ट मत यावेळी सागर भैय्या बेग यांनी व्यक्त केले आहे.ते पुढे म्हणाले की,उत्तर प्रदेशात प्रभू श्रीरामांच्या नावाने असलेल्या बलरामपूर शहरातून लवजिहादचे जाळे संपूर्ण यूपीत पसरविण्यासाठी जलालुद्दीन उर्फ झांगुर बाबाच्या बँकांच्या तब्बल चाळीस खात्यांमध्ये परदेशातून शंभर करोड रुपये येतात लवजिहाद मध्ये फसवून हिंदू मुली महिलांचे धर्मांतर करण्यासाठी पंधरा ते सोळा लाख रुपये हा झांगुर बाबा देतो त्याच्या मुसक्या जागृत हिंदूंमुळे आवळण्यात युपी पोलिसांना यश आले आहे असे झांगुर बाबा आपल्या महाराष्ट्रात देखील असू शकतात त्यासाठी आपण आता सतर्क राहणे गरजेचे असल्याचे सागर भैय्या बेग यांनी यावेळी सांगितले.

 

              अहिल्यानगर जिल्हा हिंदू जनजागृती समितीच्या समन्वयक प्रतीक्षाताई कोरेगावकर यांचे देखील उपस्थित महिला मुलींना मार्गदर्शन पर भाषण झाले.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन स्वातीताई घोलप,सुनीताताई गरुड यांनी केले तर उंबरे येथील सत्यस्पर्श महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रमिलाताई ठोकणे,विनायक दरंदले,बऱ्हाणपूर गावचे ग्रामपंचायत सदस्य संकेत भाऊ चव्हाण हे उपस्थित होते तर सोनई येथील धर्मरक्षक व राष्ट्रीय श्रीराम संघाचे सोनई चे अध्यक्ष संदीप भाऊ लांडे यांच्यासह दहावी परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनींचा याप्रसंगी सागर भैय्या बेग यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे