धार्मिक
ऑल इंडिया पॅंथर युवा सेनेच्या परळी तालुकाध्यक्षपदी धम्मपाल भुतके यांची निवड*.

*ऑल इंडिया पॅंथर युवा सेनेच्या परळी तालुकाध्यक्षपदी धम्मपाल भुतके यांची निवड*.
ऑल इंडिया पॅंथर युवा सेनेच्या परळी तालुका अध्यक्षपदी धम्मपाल भूतके यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकार द्वारे देण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार यांच्या आदेशान्वये व ऑल इंडिया पँथर सेनेचे मराठवाडा अध्यक्ष अशोक घडवे पाटील यांच्या शिफारशीवरून ऑल इंडिया पॅंथर युवा सेनेच्या परळी तालुका अध्यक्षपदी टोकवाडी येथील युवक कार्यकर्ते धम्मपाल भूतके यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली असून धम्मपाल भुतके यांनी ऑल इंडिया पँथर सेनेच्या माध्यमातून समाजातील तळागाळातील कार्यकर्त्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी काम करावे असेही प्रसिद्धी पत्रकात म्हटले असल्याची माहिती देण्यात आली आहे