श्रीरामपूर तालुक्यांमध्ये वाळूतस्करांनी पाठलाग करणाऱ्या पोलीस गाडीला धडक

श्रीरामपूर :- वाळू तस्करी करणार्या टम्पो चालकाने पाठलाग करणार्या श्रीरामपूर तालुका पोलिसांच्या गाडीला धडक देत पलायन केले. सुदैवाने या गाडीत असलेले पोलीस निरीक्षक मधुकरराव साळवे यांच्यासह त्यांचे सहकारी बालंबाल बचावले. ही घटना काल दुपारी तालुक्यातील कमालपूर परिसरात घडली.
अशोक सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल रविवारी मतदान होते. त्या निमित्ताने ठिकठिकाणी मतदान केंद्रांवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या अनुषंगाने तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक साळवे हे कमालपूर गावात पेट्रोलिंग करीत होते. त्याचवेळी त्यांना एक पिवळ्या रगाचा विना नंबर टेम्पो कमालपूर रस्त्यावरून जात दिसताना दिसला.त्यावेळी वाळू वाहतूक करणार्या या टेम्पो चालकास थांबण्यास सांगितले. पण तो थांबला नाही. त्यामुळे साळवे यांनी धाडस दाखवत पोलीस वाहनान या वाळू वाहतूक करणार्या टेम्पोचा एक किलोमीटर पर्यंत पाठलाग केला. पण पोलीस आपल्याला गाठीत असल्याचे टेम्पो चालकाच्या लक्षात येताच त्याने पोलीसांच्या वाहनास धडक दिली. व काही अंतरावर गेल्यावर चालकाने टेम्पो तसाच सोडून देत धूम ठोकली.
मुजोरवाळूतस्करांची डेरिंग पाहून सुरक्षेच्या प्रश्नावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे जिथे पोलिसच सुरक्षित नाही तिथे नागरिक सुरक्षित असतील कसे अशी चर्चा नागरिकांमध्ये ऐकावयास मिळत आहे वाळू तस्करांच्या मुसक्या आवळून यांना कठोर शिक्षा व्हायला पाहिजे अशी नागरिकांची मागणी होत आहे
दरम्यान, पोलीसांनी हा टेम्पो हस्तगत केला असून तो श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यात आणण्यात आला आहे. पसार झालेल्या चालकाचा डीवायएसपी संदीप मिटके व पोलीस निरीक्षक साळवे व त्यांचे सहकारी पसार टेम्पो चालकाचा कसून शोध घेत आहेत.