भाजपच्या आंदोलना नंतर ग्रामीण भागातील काही ठिकाणी वीज पुरवठा केला बंद

भाजपच्या आंदोलना नंतर ग्रामीण भागातील काही ठिकाणी वीज पुरवठा केला बंद
राहुरी तालुक्यात शेतकऱ्यांचे विजेबाबत गंभीर प्रश्न असून सदर प्रश्न त्वरित मार्गी न लागल्यास हातात दांडके घेऊन शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरून खंबीरपणे पाठीशी उभे राहू असे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी सांगितले.
महावितरण विरोधात राहुरी तालुका भाजपा कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन केले यावेळी ते बोलत होते.
शिवाजी कर्डिले म्हणाले की, गेल्या दोन वर्षात जाहिरात बाजी सोडून दुसरे काम झाले नाही. राहुरी नगरपालिकेची पाणीपुरवठा योजना, ब्राम्हणी व इतर पाच गावांची पाणीपुरवठा योजना श्रेय घेण्यासाठी स्थगित केली. सध्या शेतकरी अडचणीत आहेत. महावितरणने शेतकऱ्यांच्या वीज डीपी बंद करण्याचे चुकीचे धोरण हाती घेतले आहे. थकबाकी वसुली बाबत देखील राहुरीतील शेतकऱ्यांकडून जास्त भरणा करून घेतला जात आहे. ऊर्जा राज्यमंत्र्यांनी राहुरी साठी वेगळा कायदा लागू केला आहे का?, जनता दरबार भरवून नागरिकांची फसवणूक करू नये. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आपण त्यांच्या मागे उभे राहणार असून गुन्हा दाखल होऊन जेलमध्ये जाण्याची आपली तयारी आहे असे सांगत सदर प्रश्न त्वरित मार्गी न लागल्यास हातात दांडके घेऊन रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा त्यांनी यावेळी दिला. महावितरणचे उपकार्यकारी अभियंता धीरज गायकवाड यांनी निवेदन स्वीकारून शेतकऱ्यांच्या भावना वरिष्ठांना कळविण्यात येतील असे सांगितले. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष सुरेशराव लांबे, भाजपा तालुकाध्यक्ष अमोल भनगडे, संचालक रविंद्र म्हसे, मा.तालुकाध्यक्ष नानासाहेब गागरे, मच्छिंद्र गावडे, कैलास पवार, सिताराम ढोकणे, दत्तात्रय गागरे, नारायण धनवट, नारायण धोंगडे आदींनी मनोगत व्यक्त केले. आंदोलन प्रसंगी डॉ. तनपुरे कारखाना व्हा.चेअरमन दत्तात्रय ढुस, संचालक उत्तमराव आढाव, के.मा.कोळसे, नंदकुमार डोळस, मा.उपनगराध्यक्ष आर.आर.तनपुरे, युवराज गाडे, किरण अंत्रे, उदय मुथा, संजय वर्मा, सचिन मेहेत्रे, निवृत्ती आढाव, प्रभाकर धसाळ, बापू घाडगे, निसारभाई शेख, बबन कोळसे, अशोक घाडगे, बाबासाहेब जाधव, मुनिर शेख, मयूर गवळी, सुजय काळे, विक्रम गाढे,, खा.डॉ. सुजय विखे पाटील यांचे स्वीय सहायक ज्ञानेश्वर विखे, मनोज गव्हाणे आदी उपस्थित होते. जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गायकवाड यांनी प्रास्तविक करून सूत्रसंचालन केले.
राहुरी तालुका
अशोक मंडलिक