पार्किंग वसुली मध्ये मोठा गैरव्यवहार.मुख्याधिकारी चौकशी करून कारवाई करणार

पार्किंग वसुली मध्ये मोठा गैरव्यवहार.मुख्याधिकारी चौकशी करून कारवाई करणार
आळंदी/आळंदी नगरपरिषद चाकण चौक येथे वाहनतळ आहे.इंद्रायणी सेवा फाउंडेशन चे अध्यक्ष, विठ्ठल शिंदे .यांनी दक्षता घेता पार्किंग मध्ये उभे असलेल्या तीन चाकी टेम्पो मधील वारकरी भाविकांची माहिती घेतली. शिंदे यांना सदर वाहन हे विना पावती मात्र पैसे घेऊन उभे केलेले असल्याचे संशय आल्या वरून त्यांनी एक सोशल मीडियावर व्हिडिओ क्लिप व्हायरल केली.त्यामध्ये सदरचा भाविका पंढरपूरहून आळंदीला वारी निमित्त आलेले आहे सदर भाविक हा बीड येथील असून भाविकांनी दिलेल्या माहितीप्रमाणे,शंभर रुपये तीन चाकी वाहन चे शुल्क घेण्यात आले आहे.मात्र पावतीची मागणी केली असता, त्याची गरज नाही असे उत्तर कर्मचाऱ्यांनी दिल्याचे या वाहन मालकाने सांगितले आहे. याबाबतची माहिती मोबाईल द्वारे रेकॉर्ड करून इंद्रायणी सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल शिंदे यांनी सोशल मीडियावर व्हायरल केली. याबाबत माहिती घेत आळंदी नगर परिषद मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही या प्रकाराबद्दल ना पसंती व्यक्त केली. तसेच आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी सदर प्रकाराबाबत चौकशी करण्यास सुरुवात केली आहे.चाकण चौक पार्किंग परिसरामधील सीसीटीव्ही तपासणी केली जाणार असून. दोषी असणाऱ्यांवर तात्काळ कारवाई केली जाणार आहे. अशी माहिती दिली आहे. आळंदी मध्ये ठेकेदारी पद्धतीने असणाऱ्या कामगारांकडून आणखीन काही अप प्रकार घडतात का हाही प्रश्न या निमित्ताने समोर येत आहे.आळंदी नगर परिषदेमध्ये नियमित कर्मचारी कमी आणि ठेकेदार पद्धतीने असणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आहे. ठेकेदार पद्धतीने काम करणारे कर्मचारी यांच्यावर अंकुश असावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.तसेच ठेकेदार पद्धतीने काम घेणाऱ्या व्यक्तीकडून योग्य ती दखल घेतली जाते का नाही हे तपासणे गरजेचे आहे. दरम्यान आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी माधव खांडेकर यांना कोणाची तमा न बाळगता कारवाई केली जाणार असल्याची ग्वाही दिली आहे


