
टाकळीभान: -शासनाची पंतप्रधान घरकुल योजना ही प्रत्येकाला घर हे मिशन डोळ्यासमोर ठेवून ही योजना सरकार तर्फे साकार झाली आहे. व यामध्ये ज्यांना निवार्याची सोय नाही, बेघर व गरजवंतांना घर मिळावे हा या योजनेचा उद्देश आहे. परंतु वडाळा महादेव येथील ग्रामपंचायतीने ग्रामसभेच्या मंजुरीने ड घरकुलांची यादी वरिष्ठ कार्यालया कडे सादर केलेली आहे. मात्र या यादीमध्ये अनेक गरजवंतांची नावे गायब आहे ,त्यामुळे या आधी सर्वे मधून तांत्रिक कारणाने राहिलेले किंवा गरजवंत व बेघर असलेले सर्वे न झालेल्या लोकांची नावे पुनश्च यादी सर्वे करून गरजवंत, बेघर लाभार्थी यांना शासनाची महत्वकांशी घरकुल योजनेचा लाभ मिळावा अशी मागणी श्रीरामपूर शिवसेना उपतालुका प्रमुख प्रदीप पाटील वाघ यांनी श्रीरामपूर पंचायत समिती बिडी ओ यांकडे केली आहे. घरकुल योजनेपासून वंचित असलेल्या कुटुंबीयांची नावे ड यादीत समाविष्ट करून ज्यांना अजूनही राहण्यासाठी निवारा अथवा घर नाही अशा लोकांना त्यांचे शासनाच्या योजनेतून हक्काचे घर मिळावे यासाठी श्रीरामपूर शिवसेनेच्या वतीने वेळप्रसंगी जन आंदोलन उभारून या मागणीचा पाठपुरावा करण्यात येईल व गरजवंत, निवार्या पासून वंचित असलेल्या नागरिकांना न्याय देण्यात येईल असे वाघ यांनी सांगितले आहे.