कृषीवार्ता
टाकळीभान येथे पोटखराबा वर्ग 2 शेती धारक शेतकऱ्यांची सन 2018 अठरा पासून

-टाकळीभान येथे पोटखराबा वर्ग 2 शेती धारक शेतकऱ्यांची सन 2018 अठरा पासून पोटखराबा शब्द हटवून जमीन लागवडीयोग्य करून त्यावर पिक कर्ज सुविधा ,पिक विमा, कृषी अनुदान, इतर शासकीय सुविधा मिळाव्यात यासाठी शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात पाठपुरावा सुरू होता. यामध्ये माजी सैनिक, अनुसूचित जाती जमाती ची मोठ्याप्रमाणावर शेतजमीन होती. गेल्या तीन वर्षापासून यासाठी पाठपुरावा सुरू होता त्यास अखेर शासनाने शेतकऱ्यांच्या अडचणींच्या तीव्रतेची दखल घेऊन पोटखराबा शब्द हटवून ही जमीन पीक लागवड योग्य देण्यास शासनस्तरावर मंजुरी दिली आहे. त्यामुळे पोट खराबा वर्ग दोन लाभधारक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
टाकळीभान येथे पोटखराबा वर्ग 2 चे एकूण क्षेत्र 245 हेक्टर लागवडी योग्य क्षेत्र असून त्यांपैकी गट न.63,74 यांमधील 56 हेक्टर 80 आर या जमिनीची पोटखराबा शब्द हटवून पीक लागवड योग्य करण्यास शासन स्तरावर मंजुरी मिळाली आहे. याकामी श्रीरामपूरचे कर्तबगार प्रांताधिकारी अनिल पवार, कर्तव्यदक्ष तहसीलदार प्रशांत पाटील,तालुका भुमिलेख अधिकारी जितेंद्र भिंगारदिवे, टाकळीभान मंडलाधिकारी ओहळ रावसाहेब, प्रांत ऑफिस चे फिरोज सय्यद, तहसील ऑफिस चे प्रशांत पुंड, भुमिअभिलेख चे दळवी साहेब, कामगार तलाठी अरुण हिवाळे यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नाबद्दल लक्ष घालून या कामी हा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल या पोटखराबा धारक शेतकऱ्यांनी शासकीय सेवा यंत्रणेचे मनपूर्वक आभार मानले आहे त्यांच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त करून त्यांना धन्यवाद दिले आहे.
पोटखराबा धारक वर्ग-2 शेतकऱ्यांना पोटखराबा शब्दामुळे लागवड योग्य जमीन दाखवण्यास शासनस्तरावर अडचणी येत होत्या त्यामुळे यावर त्यांना शासकीय अनुदान, पिक विमा, पिक कर्ज , नैसर्गिक आपत्ती आदी सुविधा देता येत नव्हत्या या निर्णयामुळे या शेतकऱ्यांचा मार्ग सुकर होणार आहे. शेतकऱ्यांच्या अडचणीची तीव्रता लक्षात घेऊन त्यांना वेळोवेळी लागणारी शासकीय कागदपत्रे व पूर्तता करून व वेळोवेळी सहकार्य करून माझी जबाबदारी पार पाडली आहे. शेतकऱ्यांनी पाठपुरावा करून जे अतोनात पोटतिडकीने प्रयत्न केले त्यांचे हे खरे यश आहे -अरुण हिवाळे कामगार तलाठी टाकळीभान.