नाथपंथी डवरी गोसावी चषकाचे उदयन दादा गडाख यांचे हस्ते उद्घाटन.

नाथपंथी डवरी गोसावी चषकाचे उदयन दादा गडाख यांचे हस्ते उद्घाटन.
साला बाद प्रमाणे नाथपंथी डवरी गोसावी चषकाचे आयोजन करण्यात आले असुन त्या निमीत्ताने भवय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे त्याचे उद्घाटन युवा नेते उदयन दादा गडाख यांच्या हस्ते मुळा कारखान्याच्या मैदानात करण्यात आले यावेळी नाथपथी डवरी समाजांचे युवक कार्यकर्ते समाजातील जेष्ठ कार्यकर्ते तसेच सोनं,ई ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच सदिप दादा कुसळकर युवक कार्यकर्ते उदय पालवे पत्रकार अशोक भुसारी दिलीप काका शिंदे आदी उपस्थित होते नाथपंथी डवरी समाज हा वर्ष भर भटकंती करीत असतो होळीच्या सणा निमीत्ताने हा समाज एकत्र येत असतो त्या निमित्ताने या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येतं असते मागील दहा वर्षा पासून हि ष्पर्धा सोनई येथे भरवली जाते होळीच्या सणा साठी डवरी गोसावी समाज कुठलेही असला तरी तो घरी येत असतो समाजातील युवकांनी पुढाकाराने याचे आयोजन केले आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसेच परराज्यातील काही संघ सहभागी झाले आहेत प्रथम येणार्या संघास 25111 उदयन दादा गडाख यांनी दिले तर,प्रथम दुसरे बक्षीसं रेखाताई चव्हाण यांनी दिले,21111तिसरे सुभाष भोसले सर नाशिक यांनी 11111असे ठेवण्यात आले आहेत यात एकुण पंचवीस संघ सहभागी झाले
तर समाजातील दानशूर समाजाला वेळोवेळी मदत व मार्गदर्शन करणारे महादेव शिंदे सहाय्यक आयुक्त मुबंई महानगर पालिका यांनी 21000बक्षीस दिले तर संतोष चव्हाण वन परिशेत्र अधिकारी पुणे यांनी 15000रुपये दिले, व अनिल शिंदे यांनी एक्स साईज अधिकारी मुबंई यांनी दिले
आहेत स्पर्धा यशस्वी करण्यासाठी समाजातील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार मोहन शेगर,बाबा शिंदे,भाऊराव शेगर, शिवाजी शेगर, सर्जेराव शेगर नाथा बाबर, विठ्ठल शेगर अजिनाथ शेगर,बाबाजी शेगर संतोष चौगुले पिराजी शिंदे आदी कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत
कोट
नाथापंथी डवरी गोसावी समाज होळी निमित्त एकत्र येतो त्यासाठी समाजातील युवक क्रिकेटचे आयोजन केले जाते त्यासाठी मी कायम समाजाला मदतीचा हात देऊन त्याचे मनोबल वाढवतो
महादेव शिंदे, सहाय्यक आयुक्त मुबंई महानगरपालिका