संपादकीय

तिळापुर येथे सालाबादप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात.

‌तिळापुर येथे सालाबादप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात.

 

राहुरी तालुक्यातील तिळापूर येथे सालाबादप्रमाणे वैकुंठवासी हरिभक्त परायण बन्सी महाराज तांबे यांच्या प्रेरणेतून व वैकुंठवासी हरिभक्त परायण नाशिककर महाराज यांच्या आशीर्वादाने महाशिवरात्रीच्या निमित्ताने सुरू झालेल्या श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा चालू झाला आहे .

श्री संगमेश्वर देवस्थान हे  पंचकृषीचे श्रद्धास्थान असून येथे महाशिवरात्रीची मोठी यात्राही भरवली जाते येथे या आराध्य देवस्थाना जवळच मुळा व प्रवरा नद्यांचा संगम झालेला असल्याने या निसर्गरम्य परिसरामध्ये दरवर्षी होत असलेला सप्ताह भाविकांच्या स्मरणात राहणारा आठवणीचा क्षण असतो .

दरवर्षी या सप्ताहामध्ये नावाजलेल्या कीर्तनकार महाराजांचे कीर्तन श्रवण करण्याचा लाभ होत असे परंतु सध्या कोरोना परिस्थिती चे कारण लक्षात घेता कीर्तन सेवा बंद ठेवण्यात आली असून केवळ श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी वाचन गुरुवर्य भास्करगिरी जी महाराज यांच्या आशीर्वादाने श्री संत ज्ञानेश्वर संस्थान नेवासा मठाधिपती हरिभक्त परायण शिवाजी महाराज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हरिभक्त परायण मच्छिंद्र महाराज चोरमले शास्त्री व हरिभक्त परायण राजाराम महाराज तूवर यांच्या अधिपत्याखाली हा सोहळा चालू आहे.

 

या कार्यक्रम प्रसंगी रोज पहाटे काकडा सकाळी ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचन सायंकाळी हरिपाठ रात्री जागर हे नित्याचे कार्यक्रम चालू असून तसेच रोज सकाळी नाश्ता दुपारी व सायंकाळी महाप्रसादाचे वाटप गावातील व पंचक्रोशीतील भाविक भक्तांच्या पंक्ती दिल्या जातात या सर्व कार्यक्रमाचे व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे