क्रिडा व मनोरंजन
दिनकर जाधव यांची रोशनी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ज्युरी सदस्यपदी निवड.

दिनकर जाधव यांची रोशनी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ज्युरी सदस्यपदी निवड.
श्रीरामपूर तालूक्यातील भोकर येथील व सध्या मुंबई येथे स्थाईक असलेले
चित्रपट दिग्दर्शक, लेखक, कवी दिनकर जाधव यांची
रोशनी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ज्युरी सदस्यपदी भारतातून निवड झाली आहे.
रोशनी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव जानेवारी ते जुलै २०२२ मध्ये ज्युरी सदस्य म्हणून निवड करण्यात आल्याचे पत्र दिनकर जाधव यांना देण्यात आले आहे.
या झालेल्या निवडी बद्दल महोत्सवाचे संचालक
तुषार थोरात यांनी दिनकर जाधव यांचे अभिनंदन केले आहे