या गावातील अनधिकृत दारू विक्रीवर कायमस्वरूपी बंदी करणार -ए.पी.आय. सुरवसे

ग्रुप ग्रामपंचायत गेवराई (बु) ता. पैठण जि.औरंगाबाद यामधील होनोबाची वाडी, गेवराई खू, गेवराई बू आणी अब्दुलापूर या गावातील अनधिकृत दारू विक्रीवर कायमस्वरूपी बंदी आनण्यासाठी आज 25 /2/2022 रोजी चारही गावातील महीला, पूरूष तसेच सरपंच, ऊपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, कार्यकारीणी तर्फे पाचोड पोलीस स्टेशन चे सहाय्यक निरीक्षक API श्री गणेश सूरवसे साहेब, माळी साहेब, यांना ग्रामपंचायत चा ठराव तसेच निवेदनही देन्यात आले. त्यावर सूरवशे साहेब यांनी 100 % सहकार्य करून दारुबंदी करण्यात येईल असे सांगीतले आहे त्यावर सामाजिक कार्यकर्ता गजानंद बोहरा यांनी API साहेबांचे आभार व्यक्त केले. निवेदन देतांना सरपंच सौ. शोभा ज्ञानदेव वाघ, ऊपसरपंच सौ.भिमाबाई चंद्रकांत आगळे सामाजिक कार्यकर्ता श्री.गजानंद बोहरा, नवनाथ आगळे, मनोहर, गणेश ,क्रुष्णा, विठ्ठल, अजीनाथ, अंकूश आगळे.
रेवन, साईनाथ, विठ्ठल, आबासाहेब , रामदास ,बंडू आगलावे. बालू साबळे राजू गवारे गजानन तरटे
तसेच निवेदनावर सही करणारे महीला, पूरूष आणी गावकरी मंडळी ऊपस्थीत होते