संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात गुढीपाडव्यानिमित्त आकर्षक फुलांची आरास*

*संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात गुढीपाडव्यानिमित्त आकर्षक फुलांची आरास*
हिंदू धर्मशास्त्रामध्ये साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याला विशेष महत्त्व आहे आज गुढीपाडव्याच्या दिवशी संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरामध्ये आकर्षक फुलांची आरात करण्यात आली माऊलींच्या मंदिरातील गणेश मंदिर, सिद्धेश्वर मंदिर, रुक्मिणी माता मंदिर विठ्ठल रुक्मिणीचे तसेच समाधी मंदिर , विना मंडपाच्या बाहेरील भाग मंदिर परिसर विशेष फुलांचे आरात करत सजवण्यात आला होता, विधिवत परंपरेप्रमाणे माऊलींच्या मंदिरामध्ये ही गुढी उभारण्यात आली होती, हिंदू नववर्षाची सुरुवात माऊलींचे दर्शनाने करावी तसेच येणारे वर्ष सुखाचे समृद्धीचे जावो यासाठी आळंदीत मोठ्या प्रमाणात फक्त भाविकांची माऊलींचे मंदिरामध्ये गर्दी दिसून आली गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हजारो भाविकांनी माऊलींचे मंदिरात येऊन समाधीचे दर्शन घेतले, माऊलींच्या समाधी वर चंदनवटीने विविध रूप साकारण्याची परंपरा आहे गुढीपाडव्याच्या निमित्ताने आज आळंदी मध्ये समाधी मंदिरात तीन समाधीवर रांजणगाव महागणपतीचे आकर्षक मनमोहक ग्रुप साकारण्यात आले होते