गोरक्षनाथ गडावर धर्मनाथ बीज उत्साहात संपन्न

गोरक्षनाथ गडावर धर्मनाथ बीज उत्साहात संपन्न.
नगर-नगर जवळील मांजरसुंभा येथील गोरक्षनाथ गडावर धर्मनाथ बीज उत्साहात संपन्न झाली त्यानिंमताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सकाळी अभिषेक,महापूजा रमेश बाबर,शरद तागड,अरुण पवार,राधाकिसन भुतकर,बाबासाहेब कर्डीले, शिवाजी कदम, या दांपत्याच्या हस्ते करण्यात आली यावेळी अध्यक्ष ऍड शंकरराव कदम,उपाध्यक्ष जयराम कदम यांच्यासह विश्वस्त व नाथभक्त व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते
ईश्वर महाराज शास्त्री कदम,टुक्कडवेढे यांचे कीर्तन झाले त्यानंतर दुपारी गोरखनाथ करू आव्हाड यांची मुलगी सौ शीतल सुरेश पालवे यांनी आपला नोकरीचा पहिला पगार रु ३५०००महाप्रसादासाठी दिला त्यामधून महाप्रसाद वाटप झाले तसेच पारनेर तालुक्यातून सिद्धेश्वर वाडी येतुन पायी दिंडी सोहळा आला होता उत्सवानिमित्त मंदिराला लायटिंग व फुलाची आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती दिवसभर मोठ्या संख्नेने भाविक दर्शनाला आले होते
नाथपंथात सर्वात महत्वाचा उत्सव असणारा धर्मनाथ बीज आहे,प्रयाग या ठिकाणी सर्वात मोठा साजरा केला जातो मच्छिन्द्रनाथ व गोरक्षनाथ भ्रमण करत प्रयाग राज्यात गेले असता थेतील त्रिविक्रम राजाला मुलबाळ नव्हते व ते लोककल्याणकारी राजे होते , त्याचे देहांत झाले हे पाहून गोरक्षनाथ अत्यन्त दुःखी झाले त्यांनी गुरु मच्छिन्द्रनाथांना राजाला पुन्हा जिवंत करवायची विंनती केली आपण नाही केले तर मी अग्नी काष्ठ घेईल असे सांगितले त्तेव्हा मच्छिन्द्रनाथांनी मृत राजाच्या शरीरात काया प्रेवेश केला त्यामुळे राजा जिवंत झाला
त्यानंतर राजाने पुन्हा १२ वर्ष राज्य केले मच्छिन्द्रनाथपासून धर्मनाथाचा जन्म झाला धर्मनाथ १२ वर्षाचा झाल्यावर पुन्हा मछिंद्रनाथ त्रिविक्रम राजाच्या देहातून बाहेर पडले व धर्मनाथाचा राज्याभिषेक करून प्रयागचा राजा केले व १२ वर्षांनी गोरक्षनाथ येऊन धर्मनाथास अनुग्रह देतील असे सांगितले १२ वर्षांनी मच्छिन्द्रनाथ व गोरक्षनाथ यांनी पुन्हा प्रयाग येथे येऊन माघ शु द्वितीयाला गोरक्षनाथांनी धर्मनाथाना सभारंभपूर्वक नाथसंप्रदायाची दीक्षा दिली व हा दिवस धर्मनाथ बीज म्हणून साजरा करण्याचा आदेश दिला म्हणून या दिवसाला खूप महत्व आहे
गोरक्षनाथ गडावर वर्षभर भाविक व पर्यटक या ठिकाणी रोज येत असतात.येथील स्मृती मंदिराचे काम पूर्ण झाले आहे असून तीर्थक्षेत्र पर्यटन विकासातून सुमारे ७ कोटीचे काम चालू आहे