ब्रेकिंग
*ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यात शिवाजीराव (दादा) पंडित यांनी केला हरिनामाचा गजर*

*ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यात शिवाजीराव (दादा) पंडित यांनी केला हरिनामाचा गजर*
माजी मंत्री शिवाजीराव दादा पंडित यांनी नातेपुते जवळील धर्मापुरी येथे ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यात दर्शन घेऊन हरीनामाचा गजर केला. आपल्या वयाचा आणि प्रकृतिचा विचार न करता मोठ्या आनंदाने ते पालखी सोहळ्यात सहभागी झाले. पंडित परीवाराकडून सालाबादा प्रमाणे दिल्या जाणाऱ्या वारकरी पंगतीतही ते सहभागी झाले. यावेळी हरिनामात ते तल्लीन झाले.
धर्मापुरी येथे पालखी सोहळ्यातील श्री क्षेत्र संगमेश्वर संस्थानचे ह.भ.प.नामदेव महाराज यांच्या दिंडीला भेट दीली. यावेळी त्यांनी सर्व वारकऱ्यांना पंगत देऊन त्यांच्या सोबत दिंडीत सहभाग घेतला. यावेळी हरीनामाचा गजर करीत आनंदी जिवनासाठी हरीनामाचे पारायण करणे गरजेचे असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. या प्रसंगी त्यांच्या सोबत प्रकाश सुसकर, बंडू मोहिते, रघुनाथ मोहळकर, श्री भोपळे आदी उपस्थित होते.