हुरडा भाजण्यासाठी वाळलेल्या लाकडामुळे लागते कमी इंधन

हुरडा भाजण्यासाठी वाळलेल्या लाकडामुळे लागते कमी इंधन
नगर-नगर शहरात सध्या थंडी कडाक्याची पडली असून शहराजवळ विविध ठिकाणी हुरडा उपलब्ध आहे ,मात्र तो भाजण्यासाठी मोठया प्रमाणात शेणाच्या गोवऱ्या लागतात,सेंद्रिय शेतीला शेण आवश्यक आहे व हुरडा भाजण्यासाठी शेणाच्या गोवऱ्या लागतात यावर उपाय म्हणून डॉ प्रकाश कांकरिया यांनी साईबन कृषी पर्यटन केंद्रात इंधन कमी लागण्यासाठी प्रयोग केला व तो गेली ५ वर्षांपासून यशश्वी झाला व त्याप्रमाणे हुरडा भाजला जातो
हुरडा भाजण्यासाठी त्यांनी मातीच्या राजन उलटा जमिनी मध्ये गाडला,त्याला दोन्ही बाजूनी खिडक्या ठेवल्या व त्याची भट्टी केली. त्यामधून गोवऱ्या ऐवजी वाळलेली लाकडे टाकून निखार तयार केला जातो व त्यामध्ये कणसे भाजली जातात व रांजन उलटा ठेवल्याने त्याचे वरचे तोंड छोटे असल्याने सर्व उष्णता वरच्या भागात जमा होते व त्यावर परातीमध्ये तयार हुरडा गरम केला जातो व तो उत्कृस्ट असा चवीला लागतो,साईबनमध्ये वर्षभर वाळलेली लाकडे जमा करून त्याचा वापर केला जातो
त्यामुळे साईबनमध्ये पर्यावरणाचे रक्षण होते व इंधन हि वाचते व निसर्गाच्या संपत्तीचे रक्षण ही होते. येणारे लोक याकडे कुतूहलाने पाहतात व चौकशी करतात तसे निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या साईबनमध्ये हुर्ड्याची स्वाद घेण्यासाठी रोज गर्दी होत आहे. निसर्गाने पसरवलेला हिरवा हिरवा परिसर,मुलांना आकर्षित करणारी सर्व प्रकारची खेळणी व मनोरंजन करणारे प्राणी,आंब्याच्या झाडाखाली वन भोजनाचा सुखद आनंद घेण्यापूर्वी लुसलुशीत गरमागरम हुरडा,चटण्या,गुडीशेव ,रेवडी गोड आंबट बोरे,पेरूच्या फोडी,व उसाचा रस हे सर्व असलेल्या साईबांमध्ये हुरडा पार्टीची मजा म्हणजे अनोखा आनंद मिळतो
तसेच झिप लाईन हे एक विशेष नवीन आकर्षण आहे तसेच पपेट शो उंटाची गाडी,डोनाल्ड डक,मिकी माउस,अलिबाबाची गुहा आणि उंच उंच टेकड्या,त्याच्या बाजूने जाणारया रेल्वे गाडीचा आवाज आणि मोहित करणारे परिसरातील संगीत,धार्मिक व जुन्या नव्या गाण्यांची रेलचेल हे सर्व आकर्षित काणारे आहेत म्हणूनच नगर जिल्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक परिवार,स्नेही मोठ्या संख्येने साईबानच्या हुरडा पार्टीसाठी येत आहेत,तसेच हुरडा व जेवणासह वाजवि दराचे प्याकेज उपलब्ध आहे
हुरड्याचा आनंद साजरा करण्यासाठी साईबांमध्ये काही दिवस आहे असे संचालक डॉ श्री प्रकाश व डॉ सौ सुधा कांकरिया यांनी सांगितले आहे