श्रीरामपूर शहर पोलीसांची कारवाई, कत्तलीसाठी आणलेल्या 7 जिवंत जनावरासह एकुण 502800/-रु.किं.चा मुद्देमाल केला जप्त.

श्रीरामपूर शहर पोलीसांची कारवाई, कत्तलीसाठी आणलेल्या 7 जिवंत जनावरासह एकुण 502800/-रु.किं.चा मुद्देमाल केला जप्त.
दिनांक १६/०४/२०२३ रोजी दुपारी 12/30 वा. सुमारास पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी सो.. यांना गुप्तबातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, एक अशोक लेलंड कंपनीचे मालवाहू वाहन तीचा क्र. एम.एच. 04 जी.एफ. 8765 या वाहनामध्ये काही गोवंशीय वासरांना अशोक नगर ते श्रीरामपूरकडे अतिशय निर्दयतेने, कत्तल करण्याच्या उद्देशाने वाहतुक करुन घेऊन जात आहेत, अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने, पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी अशोक नगर चौकीचे बिट अंमलदार पोहेकॉ संतोष परदेशी यांना फोनव्दारे माहिती देवुन सदर गाडीचा शोध घेवुन कारवाई करण्याचे आदेश दिल्याने, अशोक नगर चौकीचे बिट अंमलदार पोहेकॉ / परदेशी यांनी तात्काळ दोन पंचाना बोलावुन घेवुन पंच व स्टाफसह सदर वाहनाचा हरेगाव फाटा ते शिरसगांव रोडने शोध घेतला असता, 13/00 वा. चे सुमारास शिरसगांव शिवारातील इंदिरानगर येथील जगताप किराणा मॉलचे समोर वरील वर्णनाचे वाहन जाताना दिसले असता त्यावरील चालकास वाहन रोडचे बाजुला घेण्यास सांगितले, सदर चालकास त्याचे नाव गाव विचारले असता त्यांने त्याचे नाव जावेद मुस्ताक कुरेशी, वय 25 वर्षे, रा. बजरंग चौक, वार्ड नं. 2, श्रीरामपूर, असे सांगितले. सदर वाहनाची पंचा समक्ष पाहणी केली असता त्यात 2800/- रु. किंमतीचे काळया, पांढऱ्या, तांबडया रंगाची 7 गोवंशीय लहान वासरे प्रत्येकी 400/- रु. किं.चे. अंदाजे, त्यांची कोणतीही चारा पाण्याची व्यवस्था न करता त्यांना निर्दयतेने कत्तल करण्याच्या उददेशाने वाहनातुन घेवुन जाताना मिळुन आला. म्हणुन अंदाजे रु 500000/-कि.जु.वा.अशोक लेलंड कंपनीचे मालवाहू वाहनासह एकुण 502800/- रु. किं.चा मुद्देमाल ज करुन जावेद मुस्ताक कुरेशी वय 25 वर्षे, रा. बजरंग चौक, वार्ड नं. 2, श्रीरामपूर, याचे विरुध्द श्रीरामपूर शहर पो.स्टे. गुन्हा रजि.क्र. 363/2023 महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियम 1955 चे सुधारित कायदा सन 2015 चे कलम 5,5 (अ), (ब), (क), 9(अ) सह प्राण्याना निर्दतेने वागविण्यास प्रतिबंध कायदा कलम 11 (ज) (च) (छ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक राकेश ओला साहेब, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर स्वाती भोर तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर विभाग श्रीरामपूर, संदिप मिट यांचे मार्गदर्शनाखाली मा. पोलीस निरीक्षक, श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन, हर्षवर्धन गवळी, यांचेकडील अशोक नगर चौकीचे बिट अंमलदार पोहेकॉ/ संतोष परदेशी, पोना/ शरद अहिरे, पोना/ किरण पवार, पोना / रघुवीर कारखेले, पोकों/श्रीराम गोसावी यांनी केली असुन दाखल गुन्हयाचा अधिक तपास हा पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी साो यांचे मार्गदर्शनाखाली पोना/ शरद अहिरे हे करीत आहेत.