मराठा आरक्षण आता घेणारच नसता रणकंदन होणार=शामराव गायकवाड

मराठा आरक्षण आता घेणारच नसता रणकंदन होणार=शामराव गायकवाड
आता पर्यंत असंख्य अशा स्वयंघोषित मराठा नेत्यांनी आणि स्वयंसेवकांनी मराठा समाजाला फसवणूक केली आहे लखोचे मोर्चे आणि करोडो चा फंड एकत्र केलेला ठराविक दलालांनी लाठला आहे आणि आता सरकारी दावणीला बांधले आहेत आणि विविध मार्गाने मराठा समाजासाठी जे कोणी आंदोलन उभे करेल त्याची बदनामी करायची आणि आंदोलनाची तीव्रता कमी करून आपल्या नेत्याला खुश करायचे असे डाव सुरू आहेत.
पण सर्व सामान्य मराठा आता अशा भुल थापांना बळी पडणार नाहीच आता जी ताकद आणि जो सर्व सामान्य जनसमुदाय मनोज जरांगे पाटील यांचा सोबत आहे तो पाहून अशा अनेक दलालांचे दुकाने बंद पडण्याचा मार्गावर आहे त्यामुळे फड फड सुरू आहे.
तरी आपल्या सारख्या असंख्य अशा जातिवंत कट्टर मराठा बांधवांनी हे लक्षात घ्यावे की आपल्या कायद्या मध्ये आणि संविधानात कुठेही जात बदलून मिळेल अशी तरतूद नाही त्यामुळे आपण अशा गैरसमजातून बाहेर पडावे आणि आता जो लढा अंतिम टप्प्यात येऊन पोचला आहे त्याचा सोबत पूर्ण ताकदीने उभे रहावे हीच अपेक्षा शिवश्री शामराव गायकवाड यांनी व्यक्त करीत आहे.