टाकळीभान ता.१०: येथील न्यू इंग्लिश स्कूल ए. पी. पी. कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता बारावीच्या लागलेल्या निकालात कला व वाणिज्य शाखेत मुलींनी बाजी मारली आहे.
वाणिज्य शाखेत वैष्णवी हंसराज कांबळे व वृषाली बंडोपंत बहिरट या दोघींनी ७८.८३ टक्के सारखे गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला आहे तर ईशा सुनील खंडागळे हिने ७७.६७ टक्के गुण मिळवून द्वितीय तर वैष्णवी ज्ञानेश्वर थोरात हिने ७६. १७ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला आहे. तसेच कला शाखेत गौरी अण्णासाहेब तनपुरे हिने ७७ .१७ टक्के गुण मिळवून प्रथम, उदय अण्णासाहेब गायकवाड ७६ .१७ याने द्वितीय तर दीक्षा भागवत रणवरे हिने ७४ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला आहे.
यांना प्राचार्य सोमनाथ मरभळ, एस. यु. जाधव, एन. एस. वखरे, एच. बी. खंडीझोड, डी.एस. दाभाडे, पी. आर. जुनघरे, एस.टी. गुटाळ, जे.डी. थोरात यांचे मार्गदर्शन लाभले.
या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.