आरोग्य व शिक्षण

मुंडे बहिण-भावाचे अबॅकसमध्ये यश; प्रियदर्शनीची आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड तर पृथ्वीराजला मास्टर मेरीट मानांकन

मुंडे बहिण-भावाचे अबॅकसमध्ये यश; प्रियदर्शनीची आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड तर पृथ्वीराजला मास्टर मेरीट मानांकन

 

 

शहरातील दत्तनगर भागातील रहिवाशी प्रियदर्शनी महादेव मुंडे व पृथ्वीराज महादेव मुंडे या बहिणी-भावाने अबॅकसमध्ये यश मिळवले आहे. प्रियदर्शनीने राष्ट्रीय ऑनलाइन अबॅकस चॅम्पियनशिपमध्ये यश मिळवले असून तिची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. तर पृथ्वीराजला अबॅकस राष्ट्रीय मॅथ चॅम्पियनशिपमध्ये मास्टर-मेरीट मानांकन मिळाले आहे. या दोघांचा सामाजिक न्याय भवनमध्ये झालेल्या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.प्रियदर्शनी महादेव मुंडेने अबॅकसमध्ये राज्यस्तरीय राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील अबॅकस चॅम्पियनशिपमध्ये उत्कृष्ट बौद्धिक क्षमता दाखवली. तिची उत्कृष्ट स्पर्धक म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड करण्यात आलेली आहे. तर राष्ट्रीय स्तरावरील ऑनलाइन अबॅकस चॅम्पियनशिप 

 

 

लर्नर्स कॅप्सूल दिल्ली यांच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या परिक्षेचा 10 मे  रोजी निकाल जाहीर करण्यात आला. या परिक्षेत नेपाळ, श्रीलंका आणि भारतातील चार हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये पृथ्वीराज महादेव मुंडे याने 8 मिनिटांमध्ये 100 प्रश्न सोडविण्याचा विक्रम केला. त्याला अबॅकस मॅथ्स सर्वोत्कृष्ट मानांकन पारितोषिक मानांकन मिळाले आहे. मुंडे बहिण -भावाच्या या यशाबद्दल सामाजिक न्याय भवन येथे झालेल्या कार्यक्रमात सी.ए. बी बी जाधव, पत्रकार संतोष मानुरकर, पत्रकार दिनेश लिंबेकर या मान्यवरांच्या हस्ते व सत्कार करण्यात आला. प्रियदर्शनी व पृथ्वीराजने मिळवेलल्या यशाबद्दल त्यांचे डॉ. एस.ए.घोडके यांच्यासह शाळेचे प्राचार्य, शिक्षक, नातेवाईकांनीअभिनंदन केले आहे.

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे