राजकिय

आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्याकडून रावसाहेब दानवे यांच्या ” त्या ” कार्यक्रमाचा समाचार*

*आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्याकडून रावसाहेब दानवे यांच्या ” त्या ” कार्यक्रमाचा समाचार*

 

*भाजपच्या माजी नगरसेवकांनी आणि भाजप नगरसेवकपद दावेदार असलेल्या कार्यकर्त्यांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश*

 

 

 

आळंदीतील फ्रूटवाला धर्मशाळा येथे नुकताच मंत्री रावसाहेब दानवे यांच्या भाजप मेळावा पार पडला. त्यामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा भाजप पक्षप्रवेशाची बातमी प्रसिद्ध झाली होती. दरम्यान आज आळंदीत शासन आपले दारी या आमदार दिलिप मोहीते पाटील यांच्या मार्गदर्शननुसार आयोजीत असलेला कार्यक्रम पार पडल्यानंतर, त्या ठिकाणी आज भाजपच्या माजी नगरसेवक असेलल्या अनेक दिग्गज कार्यकर्ते असलेल्यांनी भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला.तसेच भाजपा कडून आळंदी नगरपरिषद साठी इच्छुक नगरसेवकपदाच्या दावेदार असेलल्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते त्यांचे राष्ट्रवादीत स्वागत केले आहे. काही उत्साही पत्रकारांनी रावसाहेब दानवे यांच्या पायगुणामुळे पाऊस पडला या वक्तव्यातलाही आमदार मोहिते पाटील यांनी समाचार घेतला. रावसाहेब दानवे यांनी जालना मध्ये जिथे जिथे पाऊस नाही तिथे जाऊन पाऊस पाडावा अशी मिश्किल टिप्पणी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केली. दरम्यान आळंदीमध्ये बीजेपीच्या गोटातून बरेचसे प्रमाणात सक्रिय असलेले नगरसेवक पदाचे दावेदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गळाला लागलेले आहेत. यामध्ये प्रामुख्याने माजी नगरसेवक श्रीधर कुऱ्हाडे.अशोकराव कुऱ्हाडे .माजी नगरसेविका व भाजपच्याचिन्हावर निवडून येऊन आळंदी नगरपरिषद च्या तत्कालीन उपनगराध्यक्ष पदी असणाऱ्या पारूबाई तापकीर. भाजपा नगरसेवक पदाचे दावेदार प्रदीप बवले. भाजपा कार्यकर्ते पप्पू तापकीर आणि असंख्य भाजप कार्यकर्त्यांनी प्रवेश केल्यानंतर आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी त्या उत्साही पत्रकार ने दिलेल्या बातमीचा उल्लेख करत एखाद अर्धा कार्यकर्ता गेल्याने जो कधी पक्षीय काम करताना दिसला नाही अशा मुळे खिंडार पडत का? आणि भगदाड पडणे काय असते हे दिसले का!! अशी मिश्किल टिप्पणी केली. राष्ट्रवादी पक्षामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात भाजपचे कार्यकर्ते आले.मग आम्ही भगदाड पडलं असं म्हणायचं का. असे म्हणत एकच हशा पिकला. मुळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून कोणीही प्रवेश केलेला नाही. एखाद अर्धा कार्यकर्ता गेला म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपला. असं काहींचं जर समज असेल तर तो चुकीचा आहे. याकडे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी लक्ष वेधले. दरम्यानच्या काळामध्ये पुढील पंधरा दिवसांनी पुन्हा महाराजस्व शासन आपल्या दारी ही संकल्पनेतून लोकांची कामे मार्गी लावूने करीता पुन्हा शिबिर घेऊ तसेच आळंदी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा पक्षीय मेळावा घेणार असल्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी सांगितले. सदर कार्यक्रम प्रसंगी प्रदेश प्रतिनिधी डि.डि.भोसले.माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे, माजी नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे. साहेबराव कुऱ्हाडे. सचिन घुंडरे. सौरभ गव्हाणे.अनिकेत कुऱ्हाडे.रोहन कुऱ्हाडे.रूपाली पानसरे.पुष्पाताई कुऱ्हाडे. दमयंती कुऱ्हाडे. राणी रंधवे.गौरी गोळे. शारदा गोरे. लता मिंढे. आणि मोठ्या प्रमाणात शासकीय अडचणी आलेले नागरिक वयोवृद्ध उपस्थित होते.

1/5 - (1 vote)
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे