बापूसाहेब कोकणे यांचा अपघाती मृत्यू

बापूसाहेब कोकणे यांचा अपघाती मृत्यू
टाकळीभान येथील प्रगतशील शेतकरी व दैनिक सकाळचे बातमीदार बापूसाहेब मच्छिंद्र कोकणे (वय ५०) यांचे आज (ता.२८) रात्री आठ वाजेच्या सुमारास घरी परतत असताना चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीस धडक दिल्याने झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला.
टाकळीभान होऊन घरी परतत असताना घोगरगाव रस्त्यावर चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीस धडक दिली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. टाकळीभान येथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर श्रीरामपूरला साखर कामगार रुग्णालयात आणण्यात आले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
त्यांच्यामागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई, भाऊ , बहिणी, भावजयी, सूना, नातवंडे असा परिवार आहे. माजी उपसरपंच भास्करराव कोकणे यांचे ते बंधू होत. ते गेल्या तीन वर्षांपासून दैनिक सकाळचे टाकळीभानचे बातमीदार म्हणून कार्यरत होते. त्यांच्या अपघाती निधनाने टाकळीभान व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.