आळंदीत सर्रास गुटखा विक्री ने नागरिकांना भयंकर त्रास*

*आळंदीत सर्रास गुटखा विक्री ने नागरिकांना भयंकर त्रास*
*सार्वजनिक ठिकाणे तसेच सर्व मंदीर परिसर, रस्ता,प्रदक्षिणा घालणारे वारकरी यांचे प्रदक्षिणा मार्ग सर्वत्र थुंकलेला किळस वाना प्रकारास नागरिक वैतागले कारवाई ची मागणी*
चाकण पोलिसांनी नुकतीच कारवाई करत सुमारें 1 कोटी रुपयाचा गुटखा जप्त केला याबाबात कौतुक होत होत असतानाच आळंदीतील नागरिक माञ पोलिस प्रशासनाने असणारे दुर्लक्षाने वैतागले आहेत . सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर थुंकणे, याबाबात गुन्हा दाखल करण्याची कायद्यात तरतूद आहे, माञ आळंदीत हि कारवाई होत नाहि ,तसेच शासनाने प्रतिबंधित केलेली गुटखा विक्री आळंदीत सर्रास होत आहे, गुटखा खाऊन थुंकल्याने रस्ता घाण करून किळस वाटावी असे हे प्रकार दिवसे दिवस वाढत आहेत
सार्वजनिक ठिकाणे तसेच सर्व मंदीर परिसर, रस्ता,प्रदक्षिणा घालणारे वारकरी यांचे प्रदक्षिणा मार्ग सर्वत्र थंकलेला किळस वाना प्रकारास नागरिक वैतागले कारवाईची मागणी करत आहे, मुळात कारवाई कडक करणेस प्रशासन कमी पडते आहे अंशतः कारवाई केली तरी छुप्या मार्गाने गुटखा विक्री होत असलेच वारकरी आणि त्रस्त नागरिक सांगत आहे. दुकाने , घरे, मंदीर, दवाखाने , शाळा, महीला वावर असलेले सर्व च ठिकाणी गुटखा खाऊन थुंकण्याचे किळस वाने प्रकार बंद करावेत हि मागणी होत आहे, तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणे हा कायदेशीर गुन्हा असून दंड आणि शिक्षा अशी दोन्ही प्रकारची कारवाई ची तरतूद असताना प्रशासन आळंदी तीर्थ क्षेत्र असल्याने कारवाई दुर्लक्ष करणाऱ्या आळंदी प्रशासन आणि पोलिस प्रशासन बाबत तीव्र स्वरूपात नाराजी नागरिक व्यक्त करत आहेत.