संपादकीय

अधुनिक “स्त्री”म्हणजे घरात घरात वसलेले साडे तीन शक्तीपीठ पैकी एक अद्भुत शक्तीपीठ*—सौ वैशाली नान्नोर

 

*अधुनिक “स्त्री”म्हणजे घरात घरात वसलेले साडे तीन शक्तीपीठ पैकी एक अद्भुत शक्तीपीठ*—सौ वैशाली नान्नोर

“जागतिक महिला दिन”(8 मार्च)विशेष…

सर्व प्रथम”जागतिक महिला दिना”च्या तमाम महिला भगिनींना आधारवेल फाऊंडेशनच्या वतीने शुभेच्छां अंतराष्ट्रीय महिला दिना”च्या शुभ पर्वावर मला”स्त्री”ची महती सांगताना खूप आनंद होतोय.कारण “स्त्री” आहे म्हणूनच संसाराचा गाडा व्यवस्थित पणे सुरू आहे.त्या मागे महत्वाचे कारण असे सांगितल्या जातोय की,”स्त्री”एक नाही तर दोन दोन घरी प्रकाश देतोय.
‘स्त्री”चे विविध रूपे जर बघितले तर माझ्या मते…”स्त्री”ज्याला आई म्हणून कळली,तो जिजाऊचा शिवबा झाला..!
ज्याला”स्त्री”बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला..!!
ज्याला”स्त्री”मैत्रीण म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला..!
आणि ज्याला”स्त्री”पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला..!!आणि म्हणूनच म्हटल्या जातोय की,प्रत्येक यशस्वी पुरुषा मागे”स्त्री”चा सुद्धा तितकाच हातभार असतो.संसार रुपी गाडा व्यवस्थित चालवायचा असेल तर “स्त्री आणि “पुरुष”संसाराचे ही दोन चाके व्यवस्थित चालले पाहिजेत.आणि म्हणून या निमित्याने मला आज “जागतिक महिला दिना”चे औचित्य साधून “स्त्री”बद्दल चार शब्द लिहिण्या वाचून राहवल्या गेले नाही.
बांधवांनो आपल्या देशात स्वकर्तृत्व आणि स्वबळावर इतिहास गाजविणाऱ्या महिलांचा सुद्धा खूप मोठा इतिहास आहे.
हजारो वर्षांच्या परंपरेत असंख्य महिला राज्यकर्त्या हातात तलवार घेऊन रणांगणात सुद्धा क्षत्रूशी लढल्यात.एवढेच नाही तर मोठ मोठ्या सत्तांना उलटून टाकण्याचे काम सुद्धा अनेक महिलांनी आपल्या कर्तबगारी वर केले.आधुनिक “स्त्री”सुद्धा कुठल्याच क्षेत्रात आजही पुरुषांच्या किंचितही मागे नाही.उलट ती चार पाऊले पुरुषांच्या पुढेच आहे.विविध क्षेत्रात विभिन्न प्रकारचे व्यक्तिमत्व घडविण्याचे काम आज महिला करीत आहेत.
ग्रामीण स्तरा पासून तर आंतर राष्ट्रीय स्तरा पर्यंत,कुटुंबा पासून तर राष्ट्रव्यापी संघटने पर्यंत,कृषी क्षेत्रा पासून तर संशोधन क्षेत्रा पर्यंत,लिपिक पासून तर कलेक्टर पर्यंत,ग्रामपंचायत सदस्य पासून तर पंतप्रधान,राष्ट्रपती पर्यंत आज महिलांनी मजल मारली.म्हणूनच जीवनाच्या सर्वच क्षेत्रात महिलांची कर्तबगारी गाजत आहे.
एके काळची “चूल आणि मूल” सांभाळणारी महिला आज सुप्रीम कोर्टा पर्यंत न्यायदान करण्याचे काम करीत आहे.पाळण्याची दोरी ओढण्यात धन्यता मानणारी “स्त्री”आज राज्यकारभाराची सूत्रे यशस्वीपणे सांभाळण्याचे काम करीत आहे.चार भिंतीच्या बंदिस्त वातावरणात वावरणारी महिला आज राज्यकारभाराचे धडे देण्याचे काम करीत आहे.एवढेच नाही तर पुरुषांचे वर्चस्व असणाऱ्या राजकीय,सामाजिक,बुद्धिबळ,क्रिडा,मनोरंजन,साहित्य क्षेत्रात सुद्धा महिला पुरुषांच्या मागे राहिल्या नाहीत.स्त्रियां मुळे देश महासत्ता सुद्धा बनू शकतो.हेही तेवढेच खरे म्हणून महिलांना कोणीही कमी लेखून चालणार नाही आणि तसा प्रयत्न सुद्धा कोणी करू नये.
आज आपण बघितलेच आहे की,कल्पना चावला,सुनीता विल्यम सारख्या महिलांनी अवकाशात सुद्धा भरारी मारली.
आजची महिला आपल्या शिक्षण आणि कर्तृत्वाच्या भरवशावर अन्याय,अत्याचाराचा वनवास संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करीत आहे.तिला अपेक्षित आहे फक्त शांतीचा कळस,समाधानाचा प्रकाश,प्रीतीचा झरा,आपुलकीची नाती,स्वतंत्र मती,आणि अन्याय, अत्याचाराचा अंत.त्या साठी तिला साथ हवी वडील,भाऊ,पती आणि मुलाची..आजच्या कॉम्प्युटर युगात मानवाने प्रचंड वैज्ञानिक क्रांती केली असून त्या मध्ये महिलांचा सुद्धा खूप मोठा मोलाचा वाटा असून आज महिला कुठल्याच क्षेत्रात कमजोर नसून समाजाने तिच्या कडे पाहण्याचा दृष्टोकोन फक्त बदलला पाहिजे.
म्हणून मला आज आधुनिक स्त्री बद्दल चार शब्द लिहिण्याचे भाग्य मिळाले असून पुरुषांनी सुद्धा महिलांना घरात,दारात चांगली वागणुक द्यावी.आणि आपल्या मध्ये जो पुरुषी अहंकार भरला असेल तर तिला आपली आई,बहीण,मुलगी समजून सन्मानाची वागणूक दिली पाहिजे.बस हीच आजच्या “जागतिक महिला दिना”निमित्य मी सर्वांना विनंती करतो आणि सदर लेख जगातील माझ्या तमाम महिला भगिनींना समर्पित करते
जय अहिल्या…जय दुर्गा

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे