राजकिय

पिंपळगाव पिसा गटात किंवा देवदैठण गणांमध्ये अनुसूचित जातीचे आरक्षण निघाल्यास निवडणूक लढवणार – अमोल बोरग

पिंपळगाव पिसा गटात किंवा देवदैठण गणांमध्ये अनुसूचित जातीचे आरक्षण निघाल्यास निवडणूक लढवणार – अमोल बोरग

 

 

नव्याने स्थापित झालेल्या पिंपळगाव पिसा गट व देवदैठण गण यामध्ये जर अनुसूचित जातीचे आरक्षण लागल्यास संपूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढणार असे प्रतिपादन ढवळगाव चे माजी ग्रामपंचायत सदस्य अमोल किसन बोरगे यांनी केले आहे.

        ढवळगाव हे या पूर्वी येळपणे गट व येळपणे गणामध्ये मोडत होते. परंतु आत्ताच्या नव्याने प्रभाग रचना मध्ये ढवळगाव हे गाव पिंपळगाव पिसा गटामध्ये व देवदैठण गणांमध्ये समाविष्ट झाले आहे. त्या अनुषंगाने अमोल बोरगे यांनी या गटामध्ये किंवा गणांमध्ये अनुसूचित जातीचे आरक्षण लागल्यास निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे.

 

 

           पिंपळगाव पिसा गट,किंवा देवदैठण गणामध्ये अनुसूचित जातीचे आरक्षण आल्यास निवडणूक लढणार व गटामध्ये व गणांमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्यामार्फत तसेच विविध विभागांमार्फत शासनाच्या शेळीपालन,गोठा,गाय-म्हैस,स्प्रिंकलर,पीव्हीसी पाईप,मिरची कांडप यंत्र,पिठ गिरण,शिलाई मशीन,सोलर हिटर,कडबा कुट्टी,शाळेतील मुलींना सायकली,विहीर,संगणक यासारखे अनेक अनुदानामध्ये विविध योजना प्रभावीपणे राबवणार योजना आपल्या दारी हा उपक्रम घेऊन तालुक्यामध्ये नवीन पायंडा पाडणारा तसेच घरकुले,पाणीप्रश्न,वीजप्रश्न,शेती पूरक साधने,बचत गटांमार्फत महिला सक्षमीकरणाचे उपक्रम,तरुणांना रोजगार विषयी उपक्रम, प्रभावीपणे राबवणार :- अमोल बोरगे(मा.ग्रामपंचायत सदस्य ढवळगाव )

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे