अपघात
वांगी बुद्रुक मध्ये वय वृद्ध महिलेचे छप्पर जळून खाक वयोवृद्ध महिला जखमी.

वांगी बुद्रुक मध्ये वय वृद्ध महिलेचे छप्पर जळून खाक वयोवृद्ध महिला जखमी.
श्रीरामपूर तालुक्यातील वांगी बुद्रुक येथील चंद्रभागा नारायण माळी या वयोवृद्ध महिलेची झोपडी आज सकाळी अज्ञात कारणाने आग लागल्यामुळे जळत असताना बाहेर उभे असलेल्या चंद्रभागाबाई यांनी बघितल्यानंतर घरातील पसारा बाहेर काढण्यासाठी धाव घेतली असता त्यांना आगीच्या झळा बसून अंगावरती मोठ मोठे फोड आलेले आहेत या संदर्भामध्ये माहिती मिळताच तात्काळ महसूल विभागाचे कर्तव्यदक्ष तलाठी सूर्यवंशी भाऊसाहेब यांनी समक्ष जाऊन पाहणी केली असता छप्पर जळालेले दिसून आल्याने त्यांनी त्या संदर्भामध्ये पंचनामा करून व महिलेस हॉस्पिटलमध्ये पाठवण्याची व्यवस्था केली. प्राथमिक आरोग्य केंद्र टाकळीभान येथे पुढील उपचार चालू आहे.