धार्मिकब्रेकिंगमहाराष्ट्र

वारकऱ्यांना इंद्रायणी नदीवर जाण्यात बंदी नदीला पूर सदृश्य परिस्थिती

वारकऱ्यांना इंद्रायणी नदीवर जाण्यात बंदी नदीला पूर सदृश्य परिस्थिती

 

 

 

आळंदी/माऊलींच्या प्रस्तानाला काही तास उरलेले आहेत. असे असताना मात्र महाराष्ट्रभर पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. सर्व दूर मुसळधार पाऊस झाला आहे. माऊलींच्या प्रस्थान सोहळ्यासाठी आलेले वारकरी भाविक ओले चिंब होत नगर प्रदक्षिणा पूर्ण करताना दिसतात. मे महिन्यापासून पाऊस जोरदार बॅटिंग करत असताना नद्या नाले ओसंडून वाहत आहेत. तसेच परवा रात्रीपासून मात्र आळंदी व परिसरामध्ये  पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाच्या सरी कोसळत आहेत.

दरम्यान जाधव वाडी तलाव शंभर टक्के भरला असून कोणत्याही क्षणी सुधा नदी पात्रात विसर्ग सुरू होऊ शकतो. अशी परिस्थिती असताना आळंदी मध्ये मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक दर्शनासाठी जमा झालेले आहेत. सुधा नदीतून पुढे इंद्रायणी नदीत पाणी येत असल्याने इंद्रायणी नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

विशेषता देहू आणि आळंदीला भाविकांनी नदीपात्रात उतरू नये असा इशारा प्रशासनाने दिला असून. आळंदी पोलीस स्टेशन आळंदी नगरपरिषद यांनी वारकऱ्यांना इंद्रायणी नदीवर जाण्यास बंदी घातली आहे. 

वारकऱ्यांच्या भावनेतून पाहिल्यास इंद्रायणी नदीला खूप मोठे महत्त्व आहे इंद्रायणीच्या पाण्यामध्ये सूचिर्भूत होऊन माऊलींच्या दर्शनासाठी भाविक आतुर असतो. त्यामुळे इंद्रायणी नदीमध्ये पारंपारिक परमार्थिक आधार घेत भाविक स्नान करतात आणि पवित्र होत दर्शनाला जात असतात. मात्र पुराचा धोका वाढलेला आहे. 

इंद्राणी दुथडी भरून वाहत आहे मोठ्या प्रमाणात पाऊस अजूनही सुरू आहे त्याचा परिणाम इंद्रायणीवर पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून आळंदी पोलीस प्रशासन आणि आळंदी नगर परिषद आपत्ती कालन व्यवस्था यांना तारेवरची कसरत  करावी लागत आहे. तसेच दोन्ही क्षेपणावरूनही इंद्रायणी पात्राची पातळी वाढली असून भाविकांनी इंद्रायणी नदीकडे जाण्याचा अट्टाहास करू नये अशा सूचना प्रशासन देत आहे

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे