श्री. महादेव मंदिरास विदेशी पाहुण्यांची भेट.

श्री. महादेव मंदिरास विदेशी पाहुण्यांची भेट.
श्रीरामपूर तालूक्यातील टाकळीभान येथील ग्रामदैवत पुरातन श्री. महादेव मंदिरास जर्मनी येथील कॅरीन फ्रुट मायर यांनी भेट देवून मंदिराची पहाणी केली व श्री. शंभु महादेवाचे दर्शन घेतले.
कॅरीन फ्रुट मायर या अध्यात्म व योगा अभ्यासक
असल्याने त्या विविध तीर्थ स्थळांना भेटी देत असून
त्यांनी येथील श्री. महादेव मंदिरास भेट दिली. येथील
पुरातन सुंदर मंदिर पाहून व दर्शनाने मन प्रसन्न झाल्याचे त्यांनी सांगितले.
टाकळीभान येथील डाॅ. निसार शेख यांच्या ओळखीमुळे मला अती सुंदर मंदिर पहावयास मिळाले आहे. त्यामुळे त्यांनी डाॅ. शेख यांचे आभार मानले.
यावेळी श्री. महादेव यात्रा समिती व ग्रामस्थांनी
कॅरीन फ्रुट मायर यांचे स्वागत करून त्यांचा सत्कार केला. यावेळी राजेंद्र कोकणे, पाराजी पटारे, गजानन कोकणे, विशाल पटारे, भाऊ कोकणे, मधुकर गायकवाड, आप्पासाहेब रणनवरे, आर आर शेख, आबासाहेब रणनवरे, बंडू कोकणे, पोपट पटारे, बंडू वेताळ, विजय नारळे, दादासाहेब पटारे, भाऊसाहेब कोकणे, मंदिराचे पुजारी ओंकार जंगम आदी उपस्थित होते.