ग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न करणार -तहसीलदार प्रशांत पाटील

ग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न करणार -तहसीलदार प्रशांत पाटील
श्रीरामपुर (प्रतिनिधी )-युक्रेन रुस युध्दाच्या नावाखाली अनेक ठिकाणी जिवनावश्यक वस्तू चढ्या भावाने विकत असल्याच्या तक्रारी असुन या बाबत व्यापारी पदाधिकारी यांच्याशी चर्चा करण्यात येईल तसेच गँस वितरक व महावितरण अधिकाऱ्यांची बैठक घेवुन समस्या सोडविण्यात येतील असे तहसीलदार प्रशांत पाटील यांनी सांगितले ग्राहक दिनानिमित्त तहसील कार्यालयात ग्राहक दिन संपन्न झाला .त्या वेळी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्राहक मंचचे विभागीय अध्यक्ष रणजीत श्रीगोड हे होते प्रास्ताविक भाषणात ग्राहक मंचचे अध्यक्ष प्रा .गोरख बारहाते म्हणाले की अनेक व्यापारी चढ्या भावाने जिवनावश्यक वस्तूंची विक्री करत आहे खाद्य तेलाच्या किमती वाढलेल्या आहे ही बाब गांभिऱ्याने घेणे आवश्यक आहे युध्दाच्या नावाखाली ग्राहकांची लुट केली जात आहे .महावितरण कडून शेतकऱ्यांवर अन्याय केला जात आहे या करीता महावितरण अधिकाऱ्यांची बैठक बोलविण्यात यावी ,असेही ते म्हणाले अध्यक्षपदावरुन बोलताना रणजीत श्रीगोड म्हणाले की आज आहार कोणता घ्यावा तेच समजत नाही सर्व जिवनावश्यक वस्तूत भेसळ होत आहे झटपट पैसे मिळविण्याच्या नादात नागरीकांच्या आरोग्याशी खेळले जात आहे देश भेसळमूक्त होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहीजे .फसव्या जाहीरातीमुळे अनेकांची फसवणूक होते त्यांच्यावरही कारवाई झाली पाहीजे तसेच बदलत्या काळानुरुप व परिस्थिती नुसार कायद्यातही बदल झाला पाहीजे असेही श्रीगोड म्हणाले या वेळी लहुजी सेनेचे जिल्हाध्यक्ष भागचंद नवगीरे यांनी गँस धारकाकडून जादा रक्कम घेतली जात असल्याची तक्रार केली तसेच ग्राहक दिनात आलेल्या समस्येवर निराकरण करुन ते ईतिवृत्त पुढील ग्राहक दिनात वाचले गेले पाहीजे अशी सूचना नवगीरे यांनी मांडली या वेळी दक्षता समीतीच्या सदस्या सौ आशा परदेशी यांनीही मनोगत व्यक्त केले या वेळी अनिता आहेर अमित चंदन रितेश ऐडके कमलकिशोर मुंदडा संतोष परदेशी धान्य दुकानदार संघटनेचे तालुकाध्यक्ष बजरंग दरंदले शहराध्यक्ष गोपीनाथ शिंदे अव्वल कारकुन चारुशिला मगरे मँडम वंदना नेटके मँडम पुरवठा निरीक्षक पुजारी दक्षता कमीटी सदस्य चंद्रकांत झुरंगे भाऊसाहेब वाघमारे अरुण खंडागळे संतोष परदेशी सुभाष चोरडीया एकनाथ थोरात नाना मोरे योगेश नागले सुदर्शन पवार मुरलीधर वधवाणी राजेंद्र वधवाणी चंद्रकांत गायकवाड सुनिल पारखे अतुल झिरंगे राजेंद्र वाघ सुधीर गवारे सचिन मानधने सुभाष साळूंके नरेंद्र खरात सोमनाथ देवकर रणजीत जामकर मयुर मुखेडकर आनंद परदेशी राहुल लिहीणार आदिसह मान्यवर उपस्थित होते शेवटी देविदास देसाई यांनी आभार मानले तर रज्जाक पठाण यांनी सूत्रसंचलन केले