जिल्हा परिषद सदस्य सूर्यवंशी यांनी तिळापुर रस्त्यासाठी दिला 20 लाखाचा निधी
राहुरी तालुक्यातील तिळापूर व परिसरातील रस्त्याची चाळण झाली आहे टप्प्याटप्प्याने निधी ही मिळत आहे त्याचाच एक भाग भिका फाटा ते संगमेश्वर देवस्थान रोड साठी आमदार लहू कानडे यांनी 10 लाख रुपये निधी दिला त्यातच जिल्हा परिषद सदस्य महेश सूर्यवंशी यांनी 20 लाख रुपये निधी दिला त्यामुळे कामाला मोठी भर पडलेली आहे या कामाचे उद्घाटन प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य सूर्यवंशी यांनी आज सांगितले की पंचक्रोशीतील जागृत देवस्थान म्हणून नागरिकांची या देवस्थानावर श्रद्धा आहे रस्त्याची खूप दयनीय अवस्था झाली आहे एक वर्षांपूर्वी आपल्या गावातील ग्रामपंचायत सदस्य अण्णासाहेब कोळेकर व तंटामुक्ती अध्यक्ष अण्णासाहेब जाधव दत्तू जाधव यांनी भाजपा तालुका अध्यक्ष आशिष बीडगर यांनी माझ्याकडे पाठपुरावा केला होता हा रस्ता एक वर्षापूर्वीच मंजूर करून दिला होता परंतु टेंडर कोणी न घेतल्याने तो पडून होता परंतु आता त्याचे काम महेश कंट्रक्शन ने घेतलेले आहे आपले रस्त्याचे काम लवकरच पूर्ण होईल अजून निधी कमी पडला तर आपण परत त्याची व्यवस्था करू परंतु काम पूर्ण करून घेऊ अशी माहिती दिल्याने नागरिकांनी त्यांचे आभार मानले तसेच आशिष बिडगर यांनीही मनोगत व्यक्त केले यावेळी सूर्यवंशी यांचा ग्रामपंचायत सरपंच सुधाकर जाधव यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला तसेच इतर मान्यवरांचा देखील या वेळी सत्कार करण्यात आला यावेळी रवी म्हसे, उत्तम म्हसे, महेश कंट्रक्शन मॅनेजर, भाजपा तालुका अध्यक्ष आशिष बिडगर, ग्रामपंचायत सरपंच सुधाकर जाधव ,सदस्य अण्णासाहेब कोळेकर, बापूसाहेब आघाव, तंटामुक्ती अध्यक्ष अण्णासाहेब जाधव ,माजी सरपंच आप्पासाहेब काकड ,अखिल भारतीय मानवाधिकार मिशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष विलास गिते, हिरालाल जाधव ,दाजीबा जाधव, दत्तू जाधव, एकनाथ पवार, भाऊसाहेब काकड, दत्तात्रय विटनोर, सोपान काकड, पाराजी कोळेकर, बाळासाहेब जाधव, नानासाहेब जगताप ,रमेश खरात ,अर्जुन काकड ,अण्णा गरदरे, ग्रामपंचायत कर्मचारी हरिभाऊ आचपळे ,नारायण तुवर,आदी ग्रामस्थ उपस्थित होते सूत्रसंचालन हिरालाल जाधव यांनी केले तर आभार अजित पवार यांनी मानले
या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.