ब्रेकिंग

वांगी बुद्रुक मध्ये शासनाच्या जागेवर अतिक्रमण केलेल्या जागा नियमाकुल करण्यासाठी आमरण उपोषण

वांगी बुद्रुक मध्ये शासनाच्या जागेवर अतिक्रमण केलेल्या जागा नियमाकुल करण्यासाठी आमरण उपोषण

श्रीरामपूर तालुक्यातील वांगी बुद्रुक मध्ये वन जमिनी क्लास फॉरेस्ट गट नंबर दोन मध्ये आदिवासी भिल्ल धनगर व इतर समाजाचे लोक वस्ती करून राहतात. या राहत्या घरांचे जागा स्थळ निरीक्षण, पंचनामा ,अतिरिक्रमण धारकांचे जबाब घेऊन घरासाठी केलेले अतिक्रमण नियमाकुल करून, अतिक्रमण वन नोंदवहीत नोंद होऊन मालकी हक्काचे उतारे मिळावे. या प्रकारचे निवेदन तहसील, गटविकास अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक /सरपंच यांना देऊन आज रोजी 4 8 2025 रोजी उपोषणास निवेदनावर सह्या करणारे व इतर नागरिक बसली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, वांगी येथे आम्ही सर्व आदिवासी भिल्ल व इतर बांधव वन विभाग क्लास फॉरेस्ट गट नंबर दोन जमिनीत राहतो. या अतिक्रमण वन जमिनीत आम्हाला ग्रामपंचायत वांगी बुद्रुक यांनी रस्ता ,पाणी ,लाईट व घरकुल योजनेचा लाभ दिलेला आहे. आम्ही दिलेल्या निवेदनाची प्रशासनाने दखल न घेतल्याने, आम्ही सर्व अतिक्रमणधारक बांधव, ग्रामपंचायत कार्यालय वांगी बुद्रुक टाळे ठोक आंदोलन व ग्रामपंचायत समोर चार 2025 रोजी सकाळी 11 वाजता उपोषणास बसणार आहे. याची प्रशासनाची नोंद घ्यावी अशा प्रकारचे निवेदन दिले होते. तरी शासन यावर काय निर्णय करणार याकडे सर्व ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे