राहुरी शहरात जिथे तिथे चर्चा स्मार्ट खेळ….
केशर उद्योग समूहाचे कार्य कौतुकास्पद.... डॉ. सौ तनपुरे..

राहुरी शहरात जिथे तिथे चर्चा स्मार्ट खेळ….
पैठणीचा.
केशर उद्योग समूहाचे कार्य कौतुकास्पद…. डॉ. सौ तनपुरे..
हजोरो महिलांनी लावली हजेरी….
राहुरी शहरात नुकतेच केशर मल्टीस्टेट चे उद्योजक तसेच मा. नगरसेवक सागर दादा तनपुरे यांनी आयोजित केलेल्या सौ. स्मार्ट खेळ पैठणीचा ,आय लव राहुरी या स्पर्धेमध्ये राहुरी शहरातील अनेक महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन उस्फूर्तपणे प्रतिसाद दिला सदरच्या कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन मा. नगरसेवक सागर तनपुरे यांनी केले. सदरच्या स्पर्धेमध्ये राहुरी शहरातील वांबोरी येथील सौ निकिता वैभव साळवे या आय लव राहुरी सौ. स्मार्ट खेळ पैठणी च्या विजेत्या ठरल्या त्याबद्दल त्यांचे सौ स्मार्ट पैठणी चे आयोजक माननीय नगरसेवक तसेच केशर मल्टीस्टेट चे उद्योजक सागर तनपुरे यांनी सत्कार केला तसेच उपस्थित मान्यवर राहुरी नगर परिषदेच्या मा. नगराध्यक्षा सौ.डाॅ. उषाताई तनपुरे, युवा नेते हर्ष दादा तनपुरे, साधनाताई तनपुरे तसेच श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक यांच्या पत्नी सौ. डॉ. मिटके या सर्वांच्या हस्ते सौ. वैभव साळवी यांचा सत्कार करण्यात आला व त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
सदरच्या कार्यक्रमासाठी सहकार्याबद्दल मा. नगरसेवक सागर तनपुरे राहुरी नगर परिषदेच्या अध्यक्ष डॉ. सौ उषाताई तनपुरे, युवा नेते हर्षद दादा तनपुरे ,व इतर उपस्थित मान्यवरांनी राहुरी नगरपरिषदेच्या (समन्वयक) कुमारी सुनंदाताई दहातोंडे तसेच (पतंजली ग्रुप) योजना ताई लोखंडे (बहुजन महिला ग्रामीण विकास संघ) उपाध्यक्ष अँड मनिषा पंडित तसेच सौ. केशरबाई पतसंस्थेच्या मॅनेजर कांचन पानसंबळ तसेच अनिल देशपांडे सर या सर्वांचे देखील सत्कार करण्यात आले.
तसेच आय लव नगर ग्रुपच्या व टीमच्या वतीने सदरच्या कार्यक्रमाचे आयोजक मा. नगरसेवक तसेच केशर मल्टीस्टेट चे उद्योजक सागर तनपुरे यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांचा सत्कार करून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.
तसेच उपस्थित मान्यवर सौ. उषाताई तनपुरे, सौ साधनाताई तनपुरे, हर्षद दादा तनपुरे उपाधिक्षक यांच्या पत्नी सौ. डॉक्टर मिटके या सर्वांनी माननीय नगरसेवक केशर मल्टीस्टेट चे उद्योजक सागर तनपुरे यांच्या कार्याबद्दल त्यांचे सत्कार करून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला तसेच भावी कार्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या कार्यक्रमाच्या शेवटी राहुरी नगरपरिषदेच्या समन्वयक कुमारी सुनंदाताई दहातोंडे यांनी माननीय नगरसेवक व केशर मल्टीस्टेट चे उद्योजक सागर तनपुरे यांचे त्यांच्या या कार्याबद्दल त्यांचे आभार मानले….
तसेच आय लव नगर या टीमचे देखील आभार मानून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या….
माजी नगरसेवक सागर तनपुरे हे येणाऱ्या नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये जनसेवा मंडळाकडून नगरसेवक पदासाठी उमेदवारी करणार असल्याने सध्या सागर तनपुरे हे विविध उपक्रम राबवत असुन नुकताच पार पडलेला स्मार्ट सौ.खेळ पैठणीचा आय लव राहुरी या कार्यक्रमाची राहुरी शहरांमध्ये चांगलेच चर्चेला उधाण आले आहे.
या कार्यक्रमासाठी राहुरी शहरातील हजारो महिलांनी उपस्थिती लावली होती.