देवळाली प्रवरात दंगल,दंगलखोरांवर पोलिसांचा लाठी हल्ल्यासह गोळीबार .
दंगल काबुत आणण्यासाठी पोलिसांची रंगित तालिम असल्याचे समजताच नागरीकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

देवळाली प्रवरात दंगल,रस्त्यावर जाळपोळ पोलिसांकडून लाठीहल्ला
दंगलखोरांवर पोलिसांचा लाठी हल्ल्यासह गोळीबार ,नागरीकांन मध्ये भितीचे वातावरण
दंगल काबुत आणण्यासाठी पोलिसांची रंगित तालिम असल्याचे समजताच नागरीकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
देवळाली प्रवरा शहरातील बाजारतळ येथे गटात दंगल सुरु झाल्याची घटना समजताच …..पोलीस, दंगल नियंञक पथक, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले. नागरीकांनी दंगल सुरु असताना जमावाने टायर पेटवून फेकले.पोलिसांच्या दिशेने दगडफेक सुरु होताच पोलिसांनी नागरीकांच्या धडक कार्यवाही सुरु केली.पोलिस आंदोलकांच्या धावले असता नागरीक हि घटना स्थळावरुन पळू लागले.या घटने मुळे काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.दंगल नसुन पोलिसांच्या दंगल काबू पथकाची रंगीत तालीम सुरू आल्याचे समजताच नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. दंगल नियंञणात आणल्या नंतर पोलिस रुट मार्च करुन कायदा सुव्यस्थेचे नागरीकांना दर्शन घडविले.
सध्या राज्यात याना त्या कारणाने जातीय तेढ व आंदोलनातून दंगल घडण्याची पार्श्वभूमीवर देवळाली प्रवरातील बाजार तळावर अचानक पोलिस पथके व दंगल नियंञण पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी पथकास सुचना देवून दंगल घडविण्या नागरीकांवर सौम्य लाठी मार सुरु केला. पोलिसांची कृती सुरवात होताच उपस्थित नागरीक इकडे तिकडे पळू लागले.दंगल पथकाची रंगित तालिम असल्याचे समजताच नागरीकांनी सुटकेचा श्वास सोडला.आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर राहुरी पोलिसांच्यावतीने पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके व पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारतळ येथे आज दंगा काबू योजनेचे प्रात्यक्षिक करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी व कर्मचारी हजर होते.
अनावधानाने काही अनुचित प्रकार आणि आपत्कालीन घटना घडल्यास सदर प्रकार हाताळण्यासाठी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके व पोलीस निरीक्षक प्रताप दराडे दंगल नियंञणात आणण्यासाठी जवळच्या पोलिस ठाण्यातील पोलिस कुमक घटनास्थळी दाखल झाले. यावेळी घटनास्थळी तहसीलदार एफ.आर.शेख हे ही तातडीने घटनास्थळी दाखले.
गर्दीच्या ठिकाणी दंगल नियंञणात आणण्यासाठी गर्दी पांगविण्यासाठी प्रथम सौम्य लाढी मार करण्यात आला.अश्रु धुराचे नळकांडे फोडण्यात आली. संतप्त जमाव तही पोलिसांच्या दिशेने दगडफेक करीत असल्याने पोलिसांनी पोलिस निरीक्षक दराडे यांच्या आदेशन्वये दंगल खोरांवर गोळीबार करण्यात सुरु केला. गोळीबारात जखमी झालेल्या नागरीकांनी रुग्णवाहिणीतुन उपचारासाठी दाखल करण्यात आले. दंगल खोरांनी टायर जाळून रस्त्यावर फेकले असताना. अग्निशमन विभागास पाचारण करुन आग अटोक्यात आणली. दंगलीव नियंञण मिळविल्या नंतर कायदे सुव्यस्थेचा धाक निर्माण करण्यासाठी पोलिस तुकड्याचे रुट मार्च करण्यात आला.
आपत्कालीन दुर्घटना घडली तर जमलेल्या गर्दीला पांगवायच सराव करण्यात आला. दंगल नसुन दंगल नियंञण पथकाचा सराव असल्याचे समजताच नागरीकांनी सुटकेचा सुटकेचा निश्वास सोडला. गावात दंगल सुरु असताना माञ देवळाली प्रवरा पोलिस चौकी बंद असल्याचे दिसत होती.