राजकिय

माजी आमदार चंद्रशेखर कदम यांच्यासह २५३ सभासदांचे सभासदत्व रद्द करण्याची मागणी

देवळाली प्रवरा सोसायटीच्या माजी आमदार चंद्रशेखर कदम यांच्यासह २५३ सभासदांचे सभासदत्व रद्द करण्याची मागणी

 

देवळाली प्रवरा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे माजी आ.चंद्रशेखर कदम यांच्यासह २५३ सभासदांचे सभासदत्व रद्द करण्याची मागणी संस्थेचे सभासद अरुण कोंडीराम ढुस, कारभारी बबनराव वाळुंज, रावसाहेब सोपान मुसमाडे यांनी सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांच्या लेखी अर्जाद्वारे केली आहे. साहय्यक निबंधक यांनी चंद्रशेखर कदम यांचेसह २५३ सभासदांना नोटीस पाठवून २१ फेब्रुवारी व २४ फेब्रुवारी रोजी योग्य त्या कागदपत्रांसह उपस्थित राहुन बाजू मांडण्यास सांगितले आहे.
देवळाली प्रवरा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या माजी आ.चंद्रशेखर कदम यांच्यासह 253 सभासदांना नोटीस बजविण्यात आल्या आहे. सध्या जिल्ह्यात सहकारी संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजत असून, वेगवेगळ्या टप्यातील निवडणूक कार्यक्रमानुसार सोसायट्याच्या मतदारयाद्या अंतिम करण्याचा कार्यक्रम सुरू आहे. सहकारी संस्था अधिनियम व उपविधीतील तरतुदीनुसार १० गुंठे व त्यापेक्षा कमी क्षेत्र किंवा अजिबात क्षेत्र नावावर नसलेल्या सभासदाला विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे सभासद राहता येत नाही अशी तरतूद आहे. त्यानुसार देवळाली प्रवरा सोसाटीची मतदार यादी अंतिम करण्यापूर्वी अधिनियम व पोटनियमातील तरतुदीनुसार अरुण कोंडीराम ढुस व कारभारी बबन वाळुंज यांनी संस्थेत १९४ सभासदांना १० गुंठे व त्यापेक्षा कमी जमीन आहे. तर काही सभासदांना अजिबात जमीन नसल्याने त्यांचे सभासदत्व रद्द करण्यात यावे यासाठी तक्रार दाखल केली आहे.
तक्रार अर्जानुसार सहाय्यक निबंधक यांनी १९४ सभासदांना सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम 11 व 25 अ अन्वये नोटीस बजाविण्यात आल्या आहेत. दि. 21 व फेब्रुवारी आवश्यक कागदपत्रांसह सभासदांनी उपस्थित राहून बाजू मांडावी असे नोटीसाद्वारे कळविले आहे.
अधिनियम व पोटनियमातील तरतुदीनुसार एकाच कार्यक्षेत्रातील दोन विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीमध्ये सभासदाला सभासद राहता येत नाही. या तरतुदीनुसार देवळाली प्रवरा सोसायटी व बागायत पीक उत्पादक सोसायटी मध्ये दोनही ठिकाणी सभासद असलेल्या माजी आमदार चंद्रशेखर कदम यांच्यासह 59 सभासदांचे सभासदत्व रद्द करण्याची मागणीसाठी रावसाहेब सोपान मुसमाडे व अरुण कोंडीराम ढुस यांनी दिलेल्या तक्रार अर्जावरून राहुरीचे सहाय्यक निबंधक यांच्याकडे केली आहे. यांनी सहकारी संस्था अधिनियमा नुसार स्वतंञ नोटीस बजविण्यात आल्या आहेत. दि. 24 फेब्रुवारी रोजी योग्य त्या कागदपत्रांसह उपस्थित राहुन म्हणने मांडण्यास सांगितले आहे.
उपस्थित न राहणाऱ्या सभासदांचे काहीच म्हणणे नाही असे समजुन एकतर्फी निकाल देण्यात येईल असे हि या नोटीसात सांगण्यात आले आहे. अशा सभासदांचे सभासदत्व रद्द करण्याची पुढील कार्यवाही करण्यात येईल.
राहुरीचे माजी आमदार चंद्रशेखर कदम यांच्यासह २५३ सभासदांचे सभासदत्व रद्द करण्याबाबद नोटीसा काढण्यात आल्याने देवळाली प्रवरा सोसायटी सभासद वर्गात खळबळ उडाली आहे.
माजी.आ. चंद्रशेखर कदम यांच्यासह ५९ सभासद देवळाली सोसायटी व बागायत पीक सोसायटी या दोन्ही सोसायटी मध्ये सभासद ठेवण्यात येणार असेल तर विरोधी गटातील देवळाली सोसाटीचे जवळपास २५० सभासद बागायत पीक सोसायटी मध्ये सभासद होणेसाठी अर्ज दाखल करून बागायत पिक सोसायटीचे सभासद करुन घेण्याची लेखी मागणी करणार आहेत.
आगामी निवडणूकीत चंद्रशेखर कदम गटाला शह देण्यासाठी हा डाव आखण्यात येत असल्याचे बोलले जात आहे.
देवळाली प्रवरा सोसायटी चंद्रशेखर कदम यांच्या गटाच्या ताब्यात असून सभासद यादी प्रसिद्ध होण्यापूर्वीच चंद्रशेखर कदम यांचेसह २५३ सभासदांचे सभासदत्व रद्द करण्यासाठी मुदतीत तक्रार दाखल करून विरोधी गटाने आघाडी घेतल्याचे बोलले जात आहे.

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे