संपादकीय
लोककल्याणकारी राजा शिवछत्रपती या विषयावर वकृत्व स्पर्धेत भेर्डापुरातील कुमारी योगिता दिपक कसबे हिने जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे .

लोककल्याणकारी राजा शिवछत्रपती या विषयावर वकृत्व स्पर्धेत भेर्डापुरातील कुमारी योगिता दिपक कसबे हिने जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे .
महाराष्ट्र वकृत्व परिषद आयोजित सहकारमहर्षी कै.शिवाजीराव तागवडे ( बापु) यांच्या स्मरणार्थ “अहमदनगरचा महावक्ता ” जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा-२०२२ घेण्यात आली असून यात श्रीरामपूर तालुक्यातील भेर्डापुर येथील श्रीयुत दिपक कसबे यांची कन्या कु योगिता कसबे हिने लोककल्याणकारी राजा शिवछत्रपती या विषयावर खूप छान वक्तृत्व केले व आपल्या गावाचे व श्रीरामपूर तालुक्याचे नाव रोशन केले आहे त्यामुळे कुमारी योगिता हिला समाजातून अनेक शुभेच्छांचा वर्षाव होत असून, व कौतुकही होत आहे. तसेच तिला भविष्यातील भावी वाटचालीस शुभेच्छा, अभिनंदन दिले जात आहे.
या वकृत्व स्पर्धेत सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र ,शाल पुष्पगुच्छ देऊन कुमारी योगिता कसबे व तीचे वडील श्रीयुत दिपक कसबे यांचा महाराष्ट्र वक्तृत्व परिषदेच्या प्रतिनिधींच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे