ब्रेकिंगमहाराष्ट्रव्यवसायसंपादकीय

हिंदकेसरी ग्राम संघ वांगी बुद्रुक गटाची यशस्वी घोडदौड

हिंदकेसरी ग्राम संघ वांगी बुद्रुक गटाची यशस्वी घोडदौड

श्रीरामपूर तालुक्यातील वांगी बुद्रुक या खेडेगावातील महिलांची स्तुती करावी तेवढी कमीच आहे त्यांनी हिंदकेसरी ग्राम संघ स्थापन करून अध्यक्ष अनुराधा पारखे सचिव बेबीताई कांबळे कोषाध्यक्ष रोहिणी कांबळे यांनी या ग्राम संघाची उत्तम प्रकारे बांधणी करून या संघामध्ये लहान मोठे असे चौदा गट तयार केले या गटामध्ये जवळपास 142 महिलांनी सहभाग घेतला आहे

यामध्ये जय हनुमान जय बिरोबा संत रोहिदास सप्तशृंगी वैष्णवी मळगंगा गंगा मैया ओम साई जगदंबा स्वामी समर्थ लक्ष्मी माता आदिवासी शिवशक्ती मातोश्री या गटांचा सहभाग असून या सर्व गटांमध्ये 142 महिलांनी योग्यरीत्या काम सुख बजावत आहेत

ग्राम संघाला सुरुवातीला दोन लाख 40 हजार रुपये एच डी एफ सी बँक मार्फत कर्ज देण्यात आले ते गटांमध्ये वाटप करून सुरुवात झाली होती आता जवळपास सात लाख वीस हजाराच्या वर कर्ज वितरण झाले आहे 14 गटांची बचत जवळजवळ 29 हजार रुपयांच्या वरती आहे सध्याचे भाग भांडवल 13000 च्या वर आहे

मी लवकर या ग्राम संघाने वेगवेगळी उपक्रम राबवण्याचे ठरवले आहे त्याच अनुषंगाने सहा ऑक्टोबर रोजी वांगी बुद्रुक बिरोबा मंदिराशेजारी या भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले आहे या कार्यक्रमासाठी पंचायत समितीचे शुभांगी माळी किरण शेरे, कृषी विभागाचे शेख माजी जिल्हा परिषदेचे सदस्य शरद नवले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे

शासनाचे महिला सक्षमीकरणासाठी विविध धोरणे आहेत ग्रामीण भागात या महिला या ग्राम संघाच्या माध्यमातून धडपड करून स्वावलंबी होण्याचा प्रयत्न करत आहे ग्राम संघ नावा रोपाला आलेला आहे आज जवळपास 142 महिला एकत्र येऊन उद्योग रोजगार उपलब्ध करत आहे आज या ग्राम संघाला शासनाच्या मदतीची गरज आहे त्यासाठी अधिक पाठपुरावा करून या गटांना जास्तीत जास्त मदत देऊन शासकीय भाग भांडवल पुरवठा केल्यास ग्रामीण भागातील महिला सक्षमीकरणासाठी अग्रेसर राहतील असे यावरून स्पष्ट होते

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे