राष्ट्रनायक #साधा_माणूस

#राष्ट्रनायक
#साधा_माणूस
स्वाभिमान हरपलेल्या समाजाचा स्वाभिमान जागृत करण्यासाठी बांधा-बांधा वरती जाऊन झोपलेल्या समाजामध्ये यशवंत सेनेच्या माध्यमातून जागृती निर्माण केली. राजमाता अहिल्यामाई होळकर यांची जयंती सर्वात प्रथम त्यांच्या जन्मगावी चौंडी येथे सुरू केली. राजे उमाजी नाईक यांची जयंती सर्वात प्रथम त्यांच्या जन्मगावी भिवडी येथे सुरू केली. क्रांतिसूर्य महात्मा फुले यांची जयंती कटगुण येथे सुरू केली. महापुरुषांच्या जयंत्या साजरा करत असताना विस्थापितांना सुद्धा प्रस्थापित बनवल पाहिजे. उपेक्षित समाजातील पोरगं सुद्धा राजकारणाच्या पटलावर अग्रभागी आला पाहिजे म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना केली. हजारो नेते तयार केले. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या वरती कधी कुठले राजकीय स्वप्न न बाळगणारी माणसंसुद्धा आमदारकीची स्वप्न पाहू लागली आमदारकीचे दावेदार समजू लागली या जागृतीच्या पाठीमागे फक्त आणि फक्त महादेव जानकर साहेब हेच नाव व आत्मविश्वासाचं बळ म्हणणं काही वावग ठरणार नाही. सामन्यातील सामान्य पोराला नेता बनवण्याचा कारखाना म्हणजेच राष्ट्रीय समाज पक्ष अशी ओळख निर्माण झाली. संघर्ष करत असताना राष्ट्रीय समाज पक्षाच्या लेबल वरती आमदार निवडून आणले जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, सभापती, नगराध्यक्ष अशा विविध पदांवर ती सामान्य माणसं जाऊ लागली. राजकारणाच्या पटलावर राज्याचा राज्य कर्ता कुटूंबासाठी न जगता जनतेसाठी जगला, झिजला पाहिजे “साधी राहणी व उच्च विचारश्रेणी” ते महादेवजी जानकर साहेबांनी करून दाखवल आणि एक दिवस तो उगवला तो दिवस म्हणजे या संघर्षाच्या महामेरूचा राज्याभिषेक झाला आणि महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून आमदार महादेवजी जानकर साहेबांनी सामान्य कुटुंबातील एक माणूस स्वतःच्या पक्षातून राज्याचा पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास मंत्री म्हणून शपथ घेतली. मंत्रिपदाच्या काळामध्ये त्याचा फायदा सर्वसामान्य जनतेला झाला पाहिजे हे धेय उराशी बाळगून अतिशय प्रामाणिक काम केलं काम करत असताना कोणताही भ्रष्टाचाराचा आरोप विरोधकांनी सुद्धा केला नाही इतका स्वच्छ व पारदर्शी काम केलं. कार्यकर्त्याला राज्यमंत्री बनवलं असंख्य कार्यकर्ते दूध संघ, पशुसंवर्धन व मत्स्यविकास अंतर्गत समिती जिल्हा नियोजन समिती अशा विविध पदांवर ती गेले. महाराष्ट्र मध्येच नाही तर मोदींच्या गुजरात मध्ये भाजप विरोधात सात नगरसेवक निवडून आणले. देशामध्ये पक्षाचा हळूहळू विस्तार होऊ लागला. या संघर्षश्यात हजारो कार्यकर्ते साथीदार बनून काम करीत राहिले. राजकारणात जसे चालते तसे कित्येक सोडून गेले तितकेच नवीन जोडत राहिले. पण कधीही खचून न जाता तितक्याच जोमाने पक्ष वाढवायचा म्हणून काम करत राहिले. पैसेवाल्याना पक्ष सांभाळणं कठीण होऊन बसलंय अश्यात फाटका माणूस पक्ष चालवतोय हे कसं शक्य हा प्रश्न सर्वच राजकीय पक्षांना पडलाय पण सामन्यातील सामान्य सुद्धा पक्षासाठी मदत करतोय म्हणूनच अखंड पणे पक्ष कार्यरत आहे. दुःखाला कोरून पिणार, दारिद्र्याच्या पुरून उरणार, राष्ट्रीय समाजाच्या सहवासात भरलेल, अथांग महासागरा सारख, कुणी म्हणेल युगपुरुष तर कोणी म्हणेल महापुरुष, पण आमच्यासाठी आमचे दीपस्तंब, सोज्वळ, जिद्दी, त्यागी, एक मनमेळाऊ व्यक्तीमत्व, पुरोगामी विचारांची मुलुख मैदान तोफ, क्रांतीच्या मार्गावरील राष्ट्रीय समाजाचे आशास्थान, राष्ट्रनायक महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा रासपचे संस्थापक अध्यक्ष भावी प्रधानमंत्री
राष्ट्रनायक महादेवजी जानकर साहेबांचा आज वाढदिवस साहेब शतायुषी व्हा…!*
~ नानासाहेब जुंधारे
जिल्हाध्यक्ष- राष्ट्रीय समाज पक्ष अ,नगर