गुन्हेगारी

अल्पवयीन  मुलीला फुस लावून पळून नेणाऱ्या मुन्ना शेखच्या संगमनेर शहर पोलिसांनी श्रीरामपूरातील वार्ड नंबर दोन मधुन  आवळल्या मुसक्या

अल्पवयीन  मुलीला फुस लावून पळून नेणाऱ्या मुन्ना शेखच्या संगमनेर शहर पोलिसांनी श्रीरामपूरातील वार्ड नंबर दोन मधुन  आवळल्या मुसक्या

 

 

अल्पवयीन हिंदू मुलीला फुस लावून पळून नेणाऱ्या जिहादी मुन्ना शेखच्या संगमनेर शहर पोलिसांनी श्रीरामपूरातील मुस्लिम मोहल्ल्यातून मुसक्या आवळल्या आहेत.

हिंदू मुलीचे धर्मांतर करून तिला मुस्लिम बनविण्याचा कटसंगमनेर शहर पोलिसांनी व हिंदुत्ववादी धर्मरक्षकानी उधळलून लावल्याने लव जिहाद अजूनही थांबायचे नाव घेत नसल्याने हिंदुत्ववादी संघटना पुन्हा आक्रमक होण्याच्या पावित्र्यात आहेत.

                      श्रीरामपूर शहरातील बहुसंख्य मुस्लिम लोकसंख्या असणाऱ्या वार्ड नंबर दोन मध्ये दिड महिन्यांपासून पिडीत हिंदू मुलीला डांबून ठेवून तिचा मानसिक व शारीरिक छळ झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संगमनेर शहरातील सराईत गुन्हेगार असलेला मुन्ना शेख हा अनेक महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत होता संगमनेर शहरातून अल्पवयीन हिंदू मुलीला पळवून लव्ह- जिहादच्या जाळ्यात फसवून श्रीरामपूर येथील वार्ड नंबर दोनमधील एका घरात डांबून ठेवून राहत होता व सदरील आरोपी हा रेकॉर्ड वरील गुन्हेगार असल्याने तो श्रीरामपूरमध्ये राहूनही पोलिसांना गुंगारा देत होता.

राष्ट्रीय श्रीराम संघाच्या कार्यकर्त्यांच्या व पोलिसांच्या सतर्कतेमुळे या आरोपीला शिताफीने पकडण्यात यश आले आहेत.पीडित मुलीला तिच्या पालकांच्या ताब्यात दिले तर आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

                   दिड महिन्यांपासून मुलीचा शारीरिक,मानसिक छळ झाल्याने मुलगी पुरती भेदरलेली होती.राष्ट्रीय श्रीराम संघाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी त्याठिकाणी पाळत ठेवून खात्री पटल्यावर याबाबत लागलीच पोलिसांना माहिती देऊन आरोपीला मुलीसह ताब्यात घेतले.श्रीरामपूर मधील ज्या घरात तो महिनाभर राहिला त्याठिकाणी तो कोणाच्या मध्यस्तीने गेला त्याचा शोध सध्या पोलीस घेत असून.हे प्रकरण अत्यंत क्लेशदायक ,संतापजनक आहे.महाविद्यालयात शिकणाऱ्या सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीला लव जिहाद मध्ये अडकवून तिला खोटेनाटे आमिषे दाखवून तिला तिच्या राहत्या घरातूनच घरी कोणीही नसतांना मुन्ना शेख याने पळवून नेले.आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याने संगमनेर शहरापासून अवघ्या पन्नास किलोमीटर वर असूनही तब्बल दिड महिना त्याने पोलिसांना गुंगारा दिला.पण राष्ट्रीय श्रीराम संघाने याप्रकरणी विशेष लक्ष देऊन श्रीरामपूर शहरातील मुस्लिम मोहल्ल्यातून आरोपी पिडीत मुलीसह राहत असल्याची खबर संगमनेर पोलिसांना दिली.त्या माहितीच्या आधाराने संगमनेर पोलिसांनी श्रीरामपूर पोलिसांच्या मदतीने आरोपी मुन्ना शेखच्या मुसक्या आवळून पिडीत मुलीची त्याच्या तावडीतून सुटका केली.आरोपी मुन्ना शेखवर पॉस्को कायद्यानुसार गुन्हा नोंदवून बलात्काराच्या गुन्ह्याचीही नोंद करून त्याला ताब्यात घेतले तर पीडित मुलीला पालकांच्या ताब्यात दिले.

                    राष्ट्रीय श्रीराम संघाने पोलिसांना केलेल्या या मदतीचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे